22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeराष्ट्रीयभारतीय वायू दलाचे ‘मिराज’ कोसळले

भारतीय वायू दलाचे ‘मिराज’ कोसळले

एकमत ऑनलाईन

भोपाळ : भारतीय वायू दलातील लढाऊ विमान ‘मिराज -२०००’ हे गुरूवार दि. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास मध्य प्रदेशमध्ये दुर्घटनाग्रस्त झाले. ग्वाल्हेर इथल्या वायू दलाच्या तळावरुन नियमित सरावाच्या निमित्ताने उड्डाण केल्यावर काही मिनिटातच तांत्रिक बिघाड झाल्याचे मिराजच्या पायलटच्या लक्षात आले. इजेक्शन सीटच्या सहाय्याने पायलट विमानाच्या बाहेर आला आणि मग पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीवर सुखरूप उतरला.

या अपघाताच्या चौकशीचे तात्काळ आदेश देण्यात आल्याचे भारतीय वायू दलाने स्पष्ट केले आहे. लढाऊ विमान जमिनीवर कोसळले असले तरी या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिराज-२००० हे लढाऊ विमानांच्या प्रकारातील चौथ्या श्रेणीतले लढाऊ विमान असून भारतीय वायू दलातील एक महत्त्वाचे लढाऊ विमान समजले जाते. पाकिस्तानमध्ये बालाकोट इथे केलेल्या हवाई हल्ल्यात मिराज-२००० लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला होता.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या