29.9 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home राष्ट्रीय रामजन्मभूमी ट्रस्टच्या पैशांवर अज्ञातांकडून डल्ला

रामजन्मभूमी ट्रस्टच्या पैशांवर अज्ञातांकडून डल्ला

एकमत ऑनलाईन

लखनौ : अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामासाठी जगभरातून मोठ्या प्रमाणात मंदिराच्या ट्रस्टला देणग्या मिळाल्या आहेत. देणग्या स्विकारण्यासाठी ट्रस्टने बँक खातेही काढले आहे. मात्र या खात्यातून चोरट्यांनी क्लोन चेकचा वापर करुन ६ लाख रुपये लंपास केले आहेत.

चोरीचे हे प्रकरण बुधवारी उघडकीस आले. लखनौमधील दोन बँकांमध्ये क्लोन चेकचा वापरुन ही रक्कम काढण्यात आली. क्लोन चेक म्हणजे सारख्या दिसणा-या चेकचा वापर करून फसवणूक करणे. चोरट्यांनी याआधीही दोनवेळा ट्रस्टच्या बँक खात्यातून रक्कम काढली आहे. तिस-या वेळेस मात्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय याच्या मोबाईलवर रक्कम काढण्यासंदर्भात फोन आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. बँकेच्या कर्मचा-यांनी रक्कम मोठी असल्याने चंपत राय यांना फोन करून पैसे देण्यासाठी परवानगी मागितली होती.

मंदिराच्या निर्मितीसाठी रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या नावे आतापर्यंत ब-याच जणांनी खोटी बँक खाती उघडल्याची प्रकरणे आहेत. मात्र ट्रस्टच्या खात्यातून पैसे काढण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. कोणतीही सूचना न मिळता हे पैसे काढले गेल्याने ट्रस्टच्या सदस्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अयोध्या पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

दहा दिवसात तीनवेळा चोरी
अयोध्येतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ट्रस्टचे खाते आहे. चंपत राय आणि ट्रस्टी डॉ. अनिल मिश्र यांच्याकडेच बँक खात्याचे सर्व अधिकार आहेत. फसवणूक करणा-यांनी १ सप्टेंबर रोजी प्रथम लखनौमधून क्लोन चेकद्वारे काही रक्कम पंजाब नॅशनल बँकेच्या एका खात्यात जमा केली होती. त्यानंतर ८ सप्टेंबरला पुन्हा पीएनबीच्या खात्यात काही रक्कम जमा केली गेली. एकूण सहा लाख रुपये फसवणूक करून दुस-या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

अजनाळे गावात बेकायदेशीर दारूविक्री,जुगार,मटका जोमात सुरू; पोलीस प्रशासनाचे जाणून बुजून दुर्लक्ष

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,432FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या