22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeराष्ट्रीयसर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री : मुंबईता हा कसला गुंडाराज सुरू आहे ? कंगनाने...

सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री : मुंबईता हा कसला गुंडाराज सुरू आहे ? कंगनाने केले ट्विट

एकमत ऑनलाईन

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईमध्ये गुंडाराज सुरू असल्याचे म्हणत तिने उद्धव ठाकरे ‘जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री’ असल्याचे म्हणत जोरदार टीका केली आहे. हरियाणातील युट्यूबर साहिल चौधरीला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर कंगनाने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

आपली घरे तोडतील आणि ठार करतील ? 

साहिल चौधरीला अटक केलेली बातमी शेअर करत कंगना ट्विट केले की, मुंबईता हा कसला गुंडाराज सुरू आहे ? कोणीही जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीमला प्रश्न विचारू शकत नाही ? ते आपल्यासोबत काय करतील ? आपली घरे तोडतील आणि ठार करतील ? काँग्रेस यासाठी कोण उत्तरदायी आहे ?

हे सर्व काय आहे काँग्रेस ?

साहिल चौधरीच्या अटकेबाबत प्रश्न विचारत, कंगनाने अनुराग कश्यपवर देखील निशाणा साधला. कंगना म्हणाली की, महाराष्ट्र सरकारच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केल्यावर कोणतीही व्यक्ती अचानक साहिलच्या विरोधात एफआयआर दाखल करते, जे एक लोकशाहीच हक्क आहे आणि साहिलला त्वरित जेलमध्ये पाठवले जाते. मात्र पायल घोषने अनुराग कश्यपविरोधात एफआयआर दाखल करून अनेक दिवस झाले तरीही तो सहज फिरत आहे. हे सर्व काय आहे काँग्रेस ?

अनुराग कश्यपविरोधात कारवाई न केल्यास उपोषणाचा इशारा 

दरम्यान, पायल घोषने दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात अत्याचाराचे आरोप केले आहे. त्याच्याविरोधात कारवाई न केल्यास उपोषणाचा इशारा देखील तिने दिला आहे.

धर्माबाद येथील मालमत्ता करमुल्यांकनचे प्रस्ताव धुळखात, पालिकेचा करोडो रुपयांच्या महसुलावर पाणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या