32.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home राष्ट्रीय अद्यापही आंदोलनाची दखल नाही - राहुल गांधी

अद्यापही आंदोलनाची दखल नाही – राहुल गांधी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघात राहुल गांधींचा दौरा आहे, या दौ-यात राहुल गांधींनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहांवर हल्लाबोल केला. जगभराने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची दखल घेतली. मात्र, दिल्लीतील केंद्र सरकारला अद्यापही शेतक-यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी वाटत नाही. शेती हा एकमेव शेतक-यांचाच उद्योग-व्यवसाय आहे. भारत मातेशी संबंधित उद्योग आहे, इतर प्रत्येक व्यवसाय हे इतरांशी निगडीत असतात. पण, शेती या उद्योगावरही आपले वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न काही लोकांकडून होत आहे. या दोन ते तीन लोकांसाठीच केंद्र सरकारने ३ शेतकरी कायदे केले आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

माझ्या संसदेतील भाषणात मी हिंदीत म्हटलो होतो, हम दो हमारे दो… म्हणजे सरकारमधील दोन आणि सरकारबाहेरील दोन लोकं मिळूनच सर्वकाही निर्णय घेत असल्याचे राहुल गांधींनी म्हटले. राहुल गांधींनी हम दो हमारे दो म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा आणि उद्योगपती मुकेश अंबानी व गौतम अदानी यांचे नाव न घेता, त्यांच्यावर टीका केली होती.

इंधन दरवाढीवरुनही भडकले राहुल गांधी
तुमचा खिसा रिकामा करून मित्रांना देण्याचे महान काम मोदी सरकार मोफत करतेय, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तसेच कच्च्या तेलाच्याकिंमती वाढलेल्या नाहीत, तर उलट घसरल्या आहेत असं देखील म्हणत मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केले आहे. पेट्रोल पंपावर गाडीत तेल भरताना जेव्हा तुमची नजर वेगाने धावणा-या मीटरकडे जाईल, तेव्हा हे लक्षात घ्या की, कच्च्या तेलाचे दर वाढलेले नाहीत, तर उलट कमी झाले आहेत. पेट्रोल १०० रुपये प्रति लीटर आहे. तुमचा खिसा रिकामा करून मित्रांना देण्याचे महान काम मोदी सरकार मोफत करत आहे, असे राहुल यांनी म्हटले आहे.

पुदूचेरीचे सरकार पाडले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या