26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयराजपथाचे नाव बदलणार

राजपथाचे नाव बदलणार

एकमत ऑनलाईन

कर्तव्यपथ नवे नाव, बैठकीत मांडणार प्रस्ताव
नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीतील ऐतिहासिक राजपथाचे राजपथ हे नाव बदलले जाणार आहे. देशाच्या राजधानीतील राजपथ आता कर्तव्यपथ म्हणून ओळखला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

नवी दिल्ली म्यूनिसिपल कौन्सिल म्हणजेच एनडीएमसीने याबाबत ७ सप्टेंबरला विशेष बैठक बोलावली असल्याची माहिती आहे. त्या बैठकीत नामांतराचा प्रस्ताव मांडला जाणार आहे. एनडीएमसीने याबाबत ७ सप्टेंबरला विशेष बैठक बोलावली आहे. त्या बैठकीचा उद्देश हा राजपथ आणि सेंट्रल विस्टामधील लॉनला कर्तव्यपथ असे नाव देण्याचा प्रस्ताव ठेवला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

इंडिया गेट येथील नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा ते राष्ट्रपती भवनपर्यंतचा रस्ता कर्तव्यपथ म्हणून ओळखला जाणार आहे. राजपथाचे ब्रिटिश काळातील नाव किंग्जवे असे होते. एनडीएमसीने नवी दिल्लीतील ऐतिहासिक राजपथाचे नाव बदलण्यासाठी एक विशेष बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत राजपथाचे नाव कर्तव्यपथ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. त्याशिवाय सेंट्रल विस्टा प्रकल्पातील लॉनला देखील कर्तव्यपथ असे नाव दिले जाण्याची शक्यता आहे.

सेंट्रल विस्टा प्रकल्पातील लॉनचे नामकरण
सेंट्रल विस्टा हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो. त्यामधील लॉनलादेखील कर्तव्यपथ हे नाव देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या