33.7 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home राष्ट्रीय नाकातून देण्यात येणारी कोरोना लस तयार होणार

नाकातून देण्यात येणारी कोरोना लस तयार होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. कोरोनाच्या संकटाला रोखण्यासाठी जागभर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप स्थिती नियंत्रणात आलेली नाही. दुसरीकडे या आजाराला आळा घालण्यासाठी लस विकसित करण्याचे प्रयत्नही वेगाने सुरू आहेत. त्यासाठी औषध कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. सर्रास हातातून लस तर दिली जातेच. मात्र, कोरोनासारख्या आजाराला जिथून व्हायरस शरीरात प्रवेश करतो, तिथेच लस देण्याच्या दृष्टीने वैज्ञानिक लस तयार करीत आहेत. भारतासह अनेक देशांनी यासाठी पुढाकार घेतला असून, हे देश नाकातून देण्यात येणारी लस विकसित करीत आहेत. या माध्यमातून थेट परिणामकारकता दिसेल, असा वैज्ञानिकांचा कयास आहे.

कोरोनाची लस विकसित करण्याचे काम जगभरातील ब-याच कंपन्या करीत आहेत. या लसीच्या चाचण्याही सुरू आहेत. यातील काही चाचण्या पहिल्या, दुस-या टप्प्यात, तर काही चाचण्या तिस-या टप्प्यात आहेत. त्यामुळे येत्या एक-दोन महिन्यात लस बाजारात येऊ शकते, अशी सध्याची स्थिती आहे. मात्र, यातील ब-याच कंपन्या हाताऐवजी थेट नाकातून देण्यात येणारी लस विकसित करीत आहेत.

ही लस नाकाच्या माध्यमातूनही स्प्रेदेखील केली जाऊ शकते अथवा एअरोसोल डिलिव्हरीच्या माध्यमानेही दिली जाऊ शकते. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंपेरिअल कॉलेज आणि येल युनिव्हर्सिटीचे वैज्ञानिकदेखील म्यूकसच्या माध्यमातून नाकातून कोरोनाचा खात्मा करण्यासाठी नेसल व्हॅक्सीन अर्थात नाकातून दिली जाणारी लस तयार करीत आहेत. संपूर्ण जगाचा विचार केल्यास अमेरिका, कॅनडा, नेदरलँड, फिनलँड आणि भारतात नाकातून दिली जाणारी कोरोना लस तयार करण्यात येत आहे. या पाचही देशांतील पाच औषध कंपन्या नाकातून टाकता येईल, अशी लस तयार करीत आहेत. कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ वाटरलूच्या वैज्ञानिकांनी डीएनए बेस्ड लस तयार केली आहे. नेदरलँडमध्ये व्हॅन्जेनिंजेन, बायोव्हेटरीनरी रिसर्च आणि युट्रेच युनिव्हर्सिटीने संयुक्तपणे इंट्राव्हॅक नेसल व्हॅक्सीन तयार केली आहे. याशिवाय अमेरिकेतील अल्टीइम्युन नावाची औषध कंपनी अ‍ॅडकोविड नेसल व्हॅक्सीन तयार करीत आहे.

भारतातील भारत बायोटेकचा पुढाकार
भारतात भारत बायोटेकने कोरोफ्लू व्हॅक्सीन तयार केली आहे. भारतात तयार झालेले कोरोफ्लू हे जगप्रसिद्ध फ्लूचे औषध एम-२ एसआरच्या बेसवर तयार केले जात आहे. हे औषध योशिहिरो कावाओका आणि गॅब्रिएल न्यूमॅन यांनी संयुक्तपणे तयार केले होते. एम-२ एसआर इनफ्लूएंझा आजारावरील एक शक्तीशाली औषध आहे. हे औषध शरीरात जाताच फ्ल्यूविरोधात लढण्यासाठी अ‍ँटीबॉडीज तयार करायला सुरुवात करते. आता योशिहिरो कावाओकाने एम-२ एसआर औषधात कोरोना व्हायरसचे जीन सीक्वेन्स एकत्र केले आहेत.

नाकातून दिली जाणारी लस प्रभावी ठरणार
ळयुनिव्हर्सिटी ऑफ एरिझोनाच्या इम्युनोलॉजिस्ट दीप्ती भट्टाचार्य यांनी नाकातून टाकली जाणारी लस ही सुईने दिल्या जाणा-या लसीपेक्षा अधिक प्रभावी असू शकते. कारण जेथून कोरोना व्हायरस शरीरात प्रवेश करतो, थेट त्याच ठिकाणाहून ही लस काम करायला सुरुवात करते, असे म्हटले आहे.

शहरांचा विळखा सैल, ग्रामीण भागात उद्रेक !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या