36.1 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeराष्ट्रीयस्कॉर्पिन क्लासची तिसरी पाणबुडी नौदलाला मिळणार

स्कॉर्पिन क्लासची तिसरी पाणबुडी नौदलाला मिळणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय नौदलाला स्कॉर्पिन क्लासची तिसरी पाणबुडी लवकरच मिळणार आहे. आयएनएस करंज नावाच्या या पाणबुडीला १० मार्च रोजी मुंबईतील नौसेनेच्या ताफ्यात ती दाखल केली जाणार आहे. आयएनएस कलवरी व आयएनएस खांदेरी या नावाच्या स्कॉर्पिन क्लासच्या दोन पाणबुड्या यापुर्वीच नौदलात सामील करुन घेण्यात आल्या आहेत.

मुंबई माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) येथे २०१८ मध्ये ही पाणबुडी बांधकामास सुरुवात करण्यात आली. भारताच्या प्रोजेक्ट ७५ कार्यक्रमांतर्गत एमडीएल द्वारा बनविण्यात आलेली ही तिसरी पाणबुडी आहे. यापुर्वी दाखल केलेल्या आयएनएस कलवरी व खांदेरी या दोन्हीही पाणबुड्या समुद्रातून शत्रुवर घातक कारवाई करण्यात प्रभावी आहेत. आता त्याच वर्गातील तिसरी पाणबुडीही मिळाल्याने हिंदी महासागर व अरबी समुद्रात चीनच्या कुरापतींना तोडीस तोड उत्तर देणे शक्य होणार आहे.करंज ही स्वदेशी पाणबुडी मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत तयार केली आहे. तिसरी स्वदेशी पाणबुडी बनवून पाणबुडीनिर्मितीच्या क्षेत्रात जागतिक पटलावरील एक मोठा देश म्हणून भारताची नोंद झाली आहे.

करंजची संहारक क्षमता
आयएनएस करंज ही शत्रुला चकवा देऊन त्याच्या युद्धनौका व पाणबुड्यांवर अचुक निशाणा साधू शकते. करंज या वैशिष्ट्यांमुळे चीन व पाकिस्तान या दोन्ही देशांना भारतावर आक्रमध करताना दहावेळा विचार करावा लागणार आहे. टॉरपीडो व जहाजविरोधी क्षेपणास्त्रांच्या सहाय्यानेही शत्रुवर हल्ला करण्याची आयएनएसची करंजची क्षमता आहे. पाण्यावरुन व पाण्याखालून दोन्ही ठिकाणांवरुनही ती हल्ला करण्यात सक्षम आहे.

करंज पाणबडीची वैशिष्ट्ये
– करंज पाणबुडी ६७.५ मीटर लांब, १२.३ मीटर उंच, १५६५ टन वजनाची आहे.
– शत्रुच्या नौकांना अचूकपणे हेरुन त्यांना लक्ष्य करु शकते.
– टॉरपीडो व जहाजविरोधी क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने हल्ला करण्यास सक्षम
– पाण्याखालून व वरुन दोन्ही ठिकाणावरुन हल्ला करण्यास सक्षम
– करंजच्या वैशिष्ट्यपुर्ण रचनेमुळे ती शत्रूच्या रडारलाही सहज चकवू शकते.
– स्वत: हून आॅक्सिजननिर्मिती करण्याची क्षमता
– युद्धप्रसंगी दीर्घकाळापर्यंत पाण्याखाली राहु शकते. त्यामुळे शत्रूच्या नौकांना पाठलाग करुन नष्ट करु शकते.

अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
167FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या