19.1 C
Latur
Monday, January 18, 2021
Home राष्ट्रीय कोरोना नियंत्रणासाठी निर्णायक कृतीची गरज

कोरोना नियंत्रणासाठी निर्णायक कृतीची गरज

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जगभरात झालेला कोरोनाचा फैलाव हे दुसºया महायुद्धानंतरचे जगासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे, असे नमूद करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांना निर्णायक कृती करण्याचे आवाहन केले. केवळ आर्थिक संकटातून मुक्तता, नोक-या आणि व्यापारापुरतीच ही मर्यादित कृती नसावी, असेही ते म्हणाले. सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या १५ व्या जी-२० शिखर परिषदेत दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान मोदी यांनी संबोधन केले.

कोरोना नियंत्रणासाठी जागतिक सूची असावी
समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचावे, कारभारातील पारदर्शकता, प्रतिभासंपन्न समूहनिर्मिती आदींचा समावेश असलेली कोविड-१९ नंतरची जागतिक सूची असावी, असे आवाहन मोदी यांनी केले. ‘रिअलायझ्ािंग द आॅपॉर्च्युनिटीज आॅफ ट्वेण्टीफर्स्ट सेन्चुरी फॉर आॅल’ अशी या शिखर परिषदेची संकल्पना आहे.

कोरोनामुळे आव्हान उभे ठाकलेले असतानाही यंदा दुसरी शिखर परिषद आयोजित केल्याबद्दल सौदी अरेबियाच्या नेत्यांचे या वेळी मोदी यांनी अभिनंदन केले. कोविडनंतरच्या जगात कोठूनही काम अशी सर्वसाधारण स्थिती असेल, असे नमूद करून मोदी यांनी जी-२० दूरदृश्य सचिवालय स्थापन करण्याची सूचनाही या वेळी केली.

सांगोला येथे वीज बिलाची होळी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या