25.2 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeराष्ट्रीयदेशरक्षणासाठी करो या मरो आंदोलनाची गरज

देशरक्षणासाठी करो या मरो आंदोलनाची गरज

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी पुन्हा एकदा मोदी सरकार वर निशाना साधला असून देशरक्षणासाठी करो या मरो आंदोलनाची गरज असल्याचे ते म्हणाले आहेत.

राहुल गांधी म्हणाले या सरकार विरूध्द पुन्हा एकदा १९४२ सारखे आंदोलन करण्याची गरज आहे. राहुल गांधी यांच हे वक्तव्य भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापन दिनाच्या मोक्यावर केले. यासोबतच त्यांनी केंद्र सरकार तानाशाह सरकार विरोधात करो या मरो या सारखे आंदोलन करण्याची सक्त जरूरत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतातील हुकूमशाही सरकारच्या विरोधात आणि देशाच्या रक्षणासाठी आज आणखी एका करो या मरो आंदोलनाची गरज आहे, आता अन्यायाविरोधात बोलण्याची वेळ आली आहे, असे राहुल गांधी म्हणाले. हुकूमशाही, महागाई आणि बेरोजगारीमुळे आपल्याला भारतातून बाहेर पडावे लागेल, असेही ते म्हणाले. काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी देशातील बेरोजगारीच्या वाढीशी संबंधित आलेखाचा हवाला देत ट्विट केले की, घर-घर रोजगार, असलियत: हर घर बेरोजगार.
काँंग्रेसच्या एकानेत्याने फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले की इतिहासाचे त्या पानाला कधीच विसरू शकत नाही. भारत छोडो आंदोलन ८ ऑगस्ट १९४२ ला मुंबई मधून सुरू झालेल या आंदोलनाने इंग्रजांची झोप उडवली होती. त्या ऑगस्टच्या संध्याकाळी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर लोक जमू लागले. गांधाजी यांनी करो या मरोची घोषणा दिली. आणि त्याच्या नंतर इंग्रज राजवटीला उतरतीकळा लागली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या