34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeराष्ट्रीयशेतमालावर प्रक्रियेसाठी क्रांतीची गरज - नरेंद्र मोदी

शेतमालावर प्रक्रियेसाठी क्रांतीची गरज – नरेंद्र मोदी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : शेतमालाची विक्री करण्यासाठी शेतक-यांना अधिक पर्याय निर्माण झाले पाहिजेत आणि शेतमाल उत्पादन आणि त्याला चांगली किंमत मिळण्यासाठी अन्न प्रक्रिया क्रांतीची गरज आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. कृषि मंत्रालयासाठी अर्थसंकल्पी तरतुदींची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासंदर्भात एक वेबिनार आयोजित केला होता. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. कृषि क्षेत्रात, विशेषत: संशोधन आणि विकास कामांत खासगी गुंतवणूक वाढली पाहिजे. शेतमालाची विक्री करण्यासाठी अधिक पर्याय असण्याची गरज आहे. बंधने लागू केल्यास त्याचा कृषि क्षेत्रावर नकारात्मक परिणाम होईल,असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी कृषि क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींचीही माहिती दिली.कृषि क्षेत्रासाठी कर्जाचे उद्दिष्ट १६.५ लाख कोटी रुपयांवर नेले आहे. त्यात पशुधन, दुग्ध आणि मच्छिमारी क्षेत्राला प्राधान्य दिले आहे. ग्रामीण पायाभूत निधीतही वाढ करून तो ४० हजार कोटी रुपये केला आहे. सूक्ष्म स्ािंचनासाठीची तरतूदही दुप्पट केली आहे. आॅपरेशन ग्रीन स्कीमची व्याप्ती वाढवली असून, त्यात आणखी २२ नाशवंत पदार्थांचा समावेश केला आहे. एक हजार बाजार समित्या ई-नामशी जोडण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाभ पोहोचण्यासाठी तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे,असेही मोदींनी यावेळी सांगितले.

सीएनजी, पीएनजी दरातही वाढ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या