Thursday, September 28, 2023

आत्मनिर्भर भारताला साक्ष ठरणार नवे संसद भवन

नवी दिल्ली : नवीन संसद भवनाची निर्मिती ही नव्या व जुन्याच्या सहअस्तित्वाचे उदाहरण आहे. काळ आणि गरजेच्या अनुषंगाने नवे संसद भवन उभारले जात असून आत्मनिर्भर भारताला साक्ष ठरणारे असेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्ली येथे ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाअंतर्गत नवीन संसद भवन उभारण्यासाठी पार पडलेल्या भूमिपूजन सोहळयानंतर सांगितले.

‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाअंतर्गत नवीन संसद भवन उभारण्यासाठी आज(गुरूवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला. याप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आपल्या सध्याच्या संसद भवनाने स्वातंत्र्याचे आंदोलन व नंतर स्वतंत्र भारताला घडण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. ही इमारत आता जवळजवळ १०० वर्षांची होत आहे. अशावेळी २१ व्या शतकातील भारताला नवे संसद भवन मिळणे गरजेचे आहे, असेही मोदी म्हणाले.
सर्वधर्मीय गुरुंसह मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उद्योगपती रतन टाटा आदी मान्यवरांची उपस्थिती होती. आज मंत्रोच्चारासह विधीवतरित्या हा भूमिपूजन सोहळा पार पडला. पंतप्रधानांच्या हस्ते नवीन संसद भवनाच्या उभारणीसाठी पूजा करण्यात आली. सोहळयासाठी मान्यवरांसह सर्व धर्मांच्या गुरूंची देखील उपस्थिती होती. भूमिपूजनानंतर पंतप्रधान मोदींनी नियोजित नवीन संसद भवनाच्या कोनशिलेचे अनावरण केले.

लातूरच्या नूतन जिल्ह्याधिकाऱ्यानी पदभार स्वीकारला

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या