26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeराष्ट्रीयलसीकरणानंतर रक्ताच्या गाठींचे प्रमाण नगण्य

लसीकरणानंतर रक्ताच्या गाठींचे प्रमाण नगण्य

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जगभरातून येणा-या वेगवेगळ्या बातम्यांनी नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठल्या होत असल्याच्या अनेक बातम्यांनी नागरिक धास्तावले आहेत. त्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय एईएफआय समितीने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात रक्ताच्या गाठी होण्याचे प्रमाण खूपच कमी असल्याचे नमूद केले आहे.

कोरोनावर प्रभावीपणे मात करण्यासाठी लसीकरण हे हत्यार आहे. त्यासाठी लसीकरण मोहीम वेगाने राबविली जात आहे. असे असले तरी लस निर्मितीपासून ते लस घेईपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे अनेकांनी लस घेण्याचे अद्याप टाळले आहे. कोविशील्ड लसीकरणानंतर एकूण ४९८ जणांचा या प्रकरणी अभ्यास करण्यात आला. आतापर्यंत रक्ताच्या गाठी झाल्याची २६ प्रकरणे समोर आल्याची सांगण्यात आले आहे. कोव्हॅक्सिन संदर्भात एकही प्रकरण समितीला आढळून आले नाही.

कोविशील्ड लस घेतल्यानंतर प्रति दहा लाख प्रकरणात ०.६१ रिपोर्टींग रेट आहे. हेच प्रमाण इंग्लंडमध्ये दहा लाखांवर ४ आणि जर्मनीत दहा लाखांवर १० इतके आहे. त्यामुळे मंत्रालयाकडून एक नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यात २० दिवसात कोणताही त्रास झाल्यास तात्काळ लसीककरण केंद्रावर जाण्यास सांगण्यात आले आहे. समितीच्या अहवालानुसार देशात ७ एप्रिलपर्यंत एकूण ७ कोटी ५४ लाख जणांना लस देण्यात आली आहे. त्यात कोविशील्ड ६,८६,५०,८१९ तर कोव्हॅक्सिन ६७,८४,५६२ जणांना देण्यात आली आहे.

पायाभूत आरोग्य सुविधांमध्ये दुपटीने वाढ करा-वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या