23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयकोरोनाचा आकडा वाढतोय...धक्कादायक : ५० मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार

कोरोनाचा आकडा वाढतोय…धक्कादायक : ५० मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार

एकमत ऑनलाईन

चिंता वाढली : घराबाहेर पडताना इतरांची आणि तुमची काळजी घ्या, मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळा, सॅनिटायझरचा वापर करा, कुठेही स्पर्श करू नका, मास्क इतरांना देऊ नका

नवी दिल्ली: वेगाने पसरणाºया कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. कोरोनाच्या संकटातील एक भयानक वास्तव समोर आलं आहे. एकाच वेळी तब्बल ५० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे.

कोरोनाच्या भीतीने अनेकांनी आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार

कोरोनावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. वेगाने पसरणाºया कोरोनामुळे आतापर्यंत हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही १२ लाखांवर गेली आहे. कोरोनाच्या भीतीने अनेकांनी आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. तर अनेक ठिकाणी मृतांची संख्या वाढल्याने अंत्यसंस्कार करायला जागाच नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तेलंगणामध्ये रुग्णांवर सामूहिक अंत्यसंस्कार केल्याची घटना घडली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहावर एरक रुग्णालयाच्या स्मशानभूमीत सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनुष्यबळाचा अभाव असल्यानं एकाच ठिकाणी ५० हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार

सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. जवळपास ५० हून अधिक कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याची घटना घडली. या घटनेवर तेलंगणाचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. के. रमेश रेड्डी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. वाहतुकीचा आणि मनुष्यबळाचा अभाव असल्यानं एकाच ठिकाणी ५० हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याचं स्पष्टीकरण रेड्डी यांनी दिलं आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ५० हून अधिक रुग्णांचे मृतदेह घेऊन जाण्यासाठी वाहतूक आणि पालिका अधिकारी अपुरे असल्याने त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.

अधिकारी अपुरे असल्याने त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार

सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. जवळपास ५० हून अधिक कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याची घटना घडली. या घटनेवर तेलंगणाचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. के. रमेश रेड्डी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. वाहतुकीचा आणि मनुष्यबळाचा अभाव असल्यानं एकाच ठिकाणी ५० हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्याचं स्पष्टीकरण रेड्डी यांनी दिलं आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ५० हून अधिक रुग्णांचे मृतदेह घेऊन जाण्यासाठी वाहतूक आणि पालिका अधिकारी अपुरे असल्याने त्यांच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read More  सप्टेंबरमध्ये सुरु होऊ शकते आयपीएल, नोव्हेंबरमध्ये फायनल?

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या