22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयकोरोनाबाधितांची संख्या सहा हजारांपार

कोरोनाबाधितांची संख्या सहा हजारांपार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा आलेख पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. सलग दुस-या दिवशी देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. देशात गेल्या २४ तासांत नोंद झालेल्या नवीन कोरोना रुग्णांची संख्या सहा हजारांच्या पलिकडे गेली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात बुधवारी दिवसभरात ६ हजार ४२२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या २४ तासांत ३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आधीच्या दिवसाच्या तुलनेत कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. देशात मंगळवारी दिवसभरात ५ हजार १०८ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे बुधवारी रुग्णसंख्येत १ हजार ३१४ रुग्णांची वाढ झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या