30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeराष्ट्रीयदेशात कोरोनाच्या रुग्णसंख्येने ओलांडला १ कोटींचा टप्पा

देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येने ओलांडला १ कोटींचा टप्पा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : साधारण वर्षभरापासून जगभरात थैमान घालणाºया कोरोनाने पाहता पाहता भारतालाही विळखा घातला आहे. जगात अमेरिकेनंतर भारतात रुग्णसंख्या सर्वाधिक आहेत. दरम्यान, आता या रुग्णसंख्येने तब्बल १ कोटींचा आकडा ओलांडला आहे.

मागील २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे २५,१५३ नवे रुग्ण आढळून आले. नव्याने कोरोनाची लागण होणा-यांचा आकडा देशात काही अंशी कमी होताना दिसत आहे. पण, वैश्विक पातळीवर तुलनेने भारतातील एकूण कोरोबाधितांचा आकडा मात्र लक्ष वेधणारा ठरत आहे. आतापर्यंत देशभरात कोरोनाची लागण झाल्यामुळे १,४५,१३६ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाची लागण होऊन कोरोनामुक्­त होणाºयांचा आकडा ९५,५०,७१२ वर पोहोचला आहे. तर, देशात सध्याच्या घडीला ३,०८,७५१ कोरोनाबाधित रुग्णांवर विविध पद्धतींनी उपचार सुरु आहेत. अमेरिकेपाठोपाठ भारत एक कोटी कोरोना रुग्णांचा आकडा ओलांडणारा दुसरा देश ठरला आहे. कोविड -१९ चा संसर्ग होणारÞ्या रुग्णांच्या रिकव्हरी रेटचे प्रमाण ९५.४६ टक्­क्­यांवर पोहोचले आहे. या तुलनेने देशात सक्रिय रुग्णांची संख्या कमी असल्याचे लक्षात येत आहे. कोरोनामुळे मृत्यू होणा-यांची संख्याही देशात तुलनेने कमी आहे.

त्यामुळे काही अंशी देशाला या कोरोनाच्या विळख्यातून दिलासा मिळत असल्याची चिन्हे आहेत. पण, अनेक ठिकाणी नागरिकांचा हलगर्जीपणा आणि त्यामुळे पुन्हाचा संसर्ग होण्याचे संकट काही टळलेले नाही ही बाबही तितकीच महत्त्वाची. दरम्यान, स्वदेशी आणि परदेशी बनावटीच्या लसींना देशात अधिकृत परवानगी मिळाल्यानंतर तातडीने लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासाठी विविध स्तरावर तयारी केली जात असून, देशातील नागरिकांना कोरोनामुक्तीच्या दिशेने सरकार सक्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे. तेव्हा आता कोरोना लसीला केंद्राची अधिकृत परवानगी मिळून नेमके हे लसीकरण केव्हा सुरू होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

कारशेडवरून राजकीय सुंदोपसुंदी!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या