23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयमंकीपॉक्सची रुग्णसंख्या वाढतेय

मंकीपॉक्सची रुग्णसंख्या वाढतेय

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना महामारी पाठोपाठ आलेल्या मंकीपॉक्स या रोगाची घातकता वाढत चाललेली असतानाच, मंकीपॉक्सचा विषाणू लसीला देखील जुमानत नाही, असे ताजे निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) नोंदवले आहे. मागच्या आठवडाभरात मंकीपॉक्सची रूग्णसंख्या ७५०० पर्यंत वाढली व यात २० टक्के वाढ झाली हे गंभीर आहे असाही इशारा देण्यात आला.

डब्ल्यूएचओचे तांत्रिक प्रमुख रोसमंड लुईस व महासंचालक टेड्रोस अदनॉम घेबियस यांच्या म्हणण्यानुसार एका आठवडाभरात मंकीपॉक्सची रूग्णसंख्या २० टक्क्यांनी वाढणे गंभीर आहे. यावर लसदेखील प्रभावी ठरत नसल्याने लोकांना त्याच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी लोकांनी स्वत:च काळजी घेणे आवश्यक आहे. या रोगाची लागण झालेले लोक काही आठवड्यात बरे होतात असे आढलले तरी त्याचा धोका कमी होत नाही असेही डब्ल्यूएचओने म्हटले आहे. सुरवातीला खोकला, सर्दी, ताप, हातापायाच्या बोटांवर फोड येणे असी लक्षणे आढलतात व पहाता पहाता हा रोग गंभीर रूप धारण करतो असे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या