29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeराष्ट्रीयनव्या कोरोना रुग्णांची संख्या ९६ वर

नव्या कोरोना रुग्णांची संख्या ९६ वर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाच्या नव्या प्रकाराने पुन्हा एकदा खळबळ उडाली असताना देशातही या नव्या स्ट्रेनची संख्या ९६ वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली. या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे.

ब्रिटनमधून आलेल्या नव्या कोरोनाच्या विषाणूने काळजीत भर टाकली आहे. भारतात या नव्या विषाणूच्या संक्रमितांची संख्या १०० वर पोहोचणार आहे. दरम्यान, नुकताच मुंबईतील तीन रुग्णांमध्ये अशा प्रकारचा विषाणू आढळून आला आहे, ज्यावर अँटिबॉडीजचाही परिणाम होत नसल्याचे एका रिपोर्टमधून समोर आले आहे. टाटा मेमोरियल सेंटरचे होमियोपॅथी विभागाचे प्रा. डॉक्टर निखिल पटकर यांच्या माहितीनुसार, त्यांच्या टीमने ७०० कोविड-१९ नमुन्यांच्या जिनोमच्या सिक्वेंन्सिंगच्या माध्यमातून पडताळणी केली होती. यांपैकी तीन नमुन्यांमध्ये ई४८४के म्यूटेंट मिळाला आहे. कोविडचा हा म्यूटेंट मिळणे यासाठी चिंताजनक आहे़ कारण जुन्या विषाणूमुळे शरिरात प्रतिरोधक क्षमतेमुळे तयार झालेली तीन अँटिबॉडी यावर प्रभावहीन असल्याचे त्यांनी सांगितले़

तज्ज्ञांच्या मते धोका नाही
तज्ज्ञ मंडळीचे म्हणणे आहे की, हा नवा म्यूटेंट जास्त धोकादायक नाही. पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाचे डॉक्टर गिरिधर बाबा यांचे म्हणणे आहे की, हा म्यूटेंट सप्टेंबरमध्येच भारतात दाखल झाला आहे. जर हा इतकाच धोकादायक असता तर आतापर्यंत भारतात हाहाकार माजला असता.

जपानमध्येही नवा स्ट्रेन आढळला
ब्रिटन, दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ आता जपानमध्येही कोरोना विषाणूचा नवीन प्रकार (स्ट्रेन) आढळून आला आहे. ब्राझीलमधून जपानमध्ये परतलेल्या चार जणांमध्ये हा कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आलेले हे चारही रुग्ण ब्राझीलमधील ऍमेझॉन राज्यातून टोकीयोमध्ये परतले होते. कोरोनाचा हा नवीन स्ट्रेन आतापर्यंत जगामध्ये कुठेच आढळून आलेला नाही. तज्ज्ञांनी या स्ट्रेनसंदर्भात सतर्कतेचा इशारा दिला असून हा नवीन प्रकारचा विषाणू ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या स्ट्रेनप्रमाणेच अधिक जास्त संसर्गजन्य असल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. या नवीन स्ट्रेनचा खुलासा झाल्याने जगभरामध्ये पुन्हा खळबळ माजली आहे.

बीएमसीविरोधात सोनू सूदची हायकोर्टात धाव

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या