35.6 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home राष्ट्रीय अनिवासी भारतीयांची संख्या १.८ कोटी

अनिवासी भारतीयांची संख्या १.८ कोटी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्राने आपल्या इंटरनॅशनल मायग्रेशन २०२० हायलाइट्स हा अहवाल प्रकाशित केला असून अहवालानुसार मुळचे भारतीय असलेले पण गेल्या काही दशकांपासून परदेशात राहणा-या (अनिवासी भारतीय) लोकांची संख्या १.८ कोटी इतकी झाली आहे. अनिवासी भारतीयांपैकी सर्वाधिक भारतीय लोकसंख्या ही युएईमध्ये वास्तव्य करीत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक गोष्टींशी संबंधित विभागाने जगभरातल्या स्थलांतरित लोकांवर आधारित इंटरनॅशनल मायग्रेशन २०२० हायलाइट्स हा अहवाल जाहीर केला आहे. भारतातील लोक सर्वाधिक प्रमाणात जगभरात पसरले आहेत. संयुक्त अरब अमिरात (युएई), अमेरिका आणि सौदी अरेबिया मध्ये सर्वाधिक संख्येने भारतीय लोक वास्तव्य करतात, असेही त्यात लिहिले आहे.

आखाती देशांना भारतीयांची पसंती
अहवालानुसार संयुक्त अरब अमिरातमध्ये ३५ लाख भारतीय राहतात. त्यानंतर अमेरिकेत २७ लाख भारतीय लोक राहतात. तिसरा क्रमांक हा सौदी अरेबिया चा लागत असून त्या देशात जवळपास २५ लाख भारतीय राहतात.प्रामुख्याने रोजगारासाठी हे स्थलांतर करण्यात येत असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. आखाती देशांत सर्वाधिक भारतीय लोक स्थलांतरित झाले आहेत. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कुवैत, ओमान, पाकिस्तान, कतार आणि ब्रिटनमध्येही अनेक प्रवासी भारतीय राहत असल्याचे या अहवालात स्पष्ट केले आहे.

एकुण लोकसंख्येच्या ३.६ टक्के स्थलांतरित
स्थलांतरितांच्या संख्येत भारतानंतर मेक्सिको आणि रशियाचा क्रमांक लागतोय असे या अहवालात स्पष्ट केले आहे. मेक्सिको आणि रशियाचे प्रत्येकी १.१ कोटी लोक जगभरात वास्तव्य करतात. त्यानंतर चीनचा क्रमांक लागत असून त्या देशातील एक कोटी लोक जगभरात पसरले आहेत. सिरिया या देशातील ८० लाख लोकांनी जगातल्या इतर देशांचा सहारा घेतल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी ३.६ टक्के लोकसंख्या ही स्थलांतरीत असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.

कोव्हॅक्सिन लस घेण्यास डॉक्टरांचा नकार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या