23.4 C
Latur
Sunday, August 9, 2020
Home राष्ट्रीय देशात ५५ हजारांवर वाढले रुग्ण

देशात ५५ हजारांवर वाढले रुग्ण

चिंताजनक, मृत्यूदरात भारताने इटलीलाही टाकले मागे

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे थैमान अजूनही थांबलेले नाही. मागील काही दिवसांपासून दररोज ५० हजार किंवा त्यापेक्षा जास्त रुग्णसंख्या दिवसाला आढळून येत आहे, तर दुसरीकडे सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनानंतरही कोरोनाबळींचा आकडाही वाढत चालला आहे. शुक्रवारी भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येत ७७९ इतकी भर पडली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत आता इटलीला मागे टाकत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत प्रथमच उच्चांकी ५५ हजार ७९ रुग्ण वाढले. त्यामुळे सलग दुसºया दिवशी देशात नव्या रुग्णांची मोठी भर पडली आहे.

यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १६ लाख ३८ हजार ८७१ इतकी झाली आहे. यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ लाख ४५ हजार ३१८, तर सुटी मिळालेल्या रुग्णांची संख्या १० लाख ५७ हजार ८०६ एवढी आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३५ हजार ७४७ इतकी झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील १८ हजार रुग्णांचा मृत्यू जुलै महिन्यात झाला आहे. रुग्णांच्या मृत्यू संख्येबरोबरच भारत जगात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. यापूर्वी पाचव्या स्थानी असलेल्या इटलीला भारताने मागे टाकले.

मृत रुग्णांच्या क्रमवारीत भारत आता पाचव्या स्थानी
जुलै महिन्यात देशात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून, ही संख्या ३५ हजारांवर गेली आहे. यातील तब्बल १८ हजार रुग्णांचा जुलै महिन्यात बळी गेला. वाढत्या रुग्णसंख्येमुळे भारत जगात पाचव्या स्थानी गेला. यात अमेरिका (१ लाख ५२ हजार ७०) प्रथम, ब्राझील (९१ हजार २६३) द्वितीय, ब्रिटन (४६ हजार ८४) आणि मेक्सिको (४६ हजार) तिसºया आणि चौथ्या क्रमांकावर आणि भारत पाचव्या स्थानी पोहोचला आहे.

एका महिन्यात १० लाख रुग्णवाढ
देशात कोरोनामुळे मरण पावणाºयांच्या एकूण संख्येपैकी ४९ टक्के मृत्यू २० शहरांमध्ये झाले आहेत. त्यात आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार ३० जूनपर्यंत देशात ५ लाख ६६ हजार ८४० इतकी कोरोना रुग्णांची संख्या होती. जुलै महिन्यात यात सर्वाधिक म्हणजे १० लाख नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.

राज्यात ७ हजारांवर रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात आज दिवसभरात ७ हजार ५४३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट ६० टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, आज १० हजार ३२० रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णसंख्या ४ लाख २२ हजार ११८ इतकी झाली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आज राज्यात २६५ कोरोनाबाधित रुग्णांनी जीव गमावला. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५६ हजार १५८ झाली आहे. सध्या १ लाख ५० हजार ६६२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Read More  कर्जावरील ईएमआयमध्ये आणखी सवलत?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,140FansLike
93FollowersFollow