22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeराष्ट्रीयराज्यात रुग्णसंख्या वाढली

राज्यात रुग्णसंख्या वाढली

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात मागील २४ तासांत ५ हजार ५३५ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत, तर १५४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच एकूण रुग्णसंख्या १७ लाख ६३ हजार ५५ वर गेली आहे. त्यापैकी १६ लाख ३५ हजार ९७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर आज घडीला ७९ हजार ७३८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

याशिवाय आजपर्यंत ४६ हजार ३५६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, मागील २४ तासांत ५ हजार ८६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ९२.७९ टक्के इतका झाला आहे. दरम्यान, मुंबईत कोरोनाचे ९२४ नवे रुग्ण मागील २४ तासांमध्ये आढळले आहेत, तर १ हजार १९२ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. मागील २४ तासांमध्ये मुंबईत १२ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत २ लाख ७२ हजार ४४९ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली. त्यापैकी २ लाख ४९ हजार ९०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर आतापर्यंत एकूण १० हजार ६२४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

देशात ४८ हजार रुग्णांची कोरोनावर मात
देशात मागील काही दिवसांत कोरोनामुक्त होणाºयांच्या संख्येत वाढ झालेली दिसत असली, तरी सणासुदीच्या काळात नागरिक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडल्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडत आहे. याचबरोबर कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू होणेही सुरूच आहे. मागील २४ तासांत देशात ४८ हजार ४९३ जणांनी कोरोनावर मात केली, तर ४५ हजार ५७९ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय ५८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८९ लाख ५८ हजार ४८४ वर पोहोचली आहे. सद्यस्थितीत देशात ४ लाख ४३ हजार ३०३ अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. आतापर्यंत ८३ लाख ८३ हजार ६०३ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे, तर आजपर्यंत १ लाख ३१ हजार ५७८ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत.

बहीण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या