26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeराष्ट्रीयआंध्रात बळींची संख्या २५ वर

आंध्रात बळींची संख्या २५ वर

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्ये बुधवार दि़ १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत एकूण २५ लोक ठार झाले असून, यांपैकी तेलंगणमध्ये १८ लोक ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे़ आंध्र प्रदेशात ७ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरीमध्ये अनेक घरे जलमय झाली आहेत़ मुसळधार पावसामुळे लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. बचाव कार्यासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली असून लोकांना वाचवण्यासाठी राज्य सरकारांच्या मदतीने भारतीय लष्कर देखील या मोहिमेत सहभागी झाले आहे.

अधिका-यांनी हाय अ‍ॅलर्टवर राहावे आणि मदत शिबिरांमध्ये आश्रय घेणा-या पीडित नागरिकांना आवश्यक ती मदत देण्याचे आदेश मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी दिले आहेत. तसेच शिबिरातील प्रत्येक व्यक्तीला ५०० रुपये देण्याची देखील घोषणा केली. चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस कोसळला असून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

दोन्ही मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांशी चर्चा
पावसामुळे हैराण झालेले तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बातचित केली.

सर्वतोपरी मदतीचे पंतप्रधानांचे आश्वासन
आवश्यक ती सर्व मदत तेलंगण आणि आंध्र प्रदेशला दिली जाईल असे आश्वासन या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांना दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत याची माहिती दिली.

राष्ट्रपतींनी व्यक्त केले दु:ख
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील या निसर्गाच्या संकाटामुळे झालेल्या नुकसानाबाबत दु:ख व्यक्त केले आहे.

करमाळा शहर व परीसरात पावसाचा हाहाकार ; ग्रामपंचायत कार्यालयात पाणी घुसले, पिकांचेही नुकसान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या