20.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeआंतरराष्ट्रीयओआयसीला जम्मू-काश्मीरबद्दल बोलण्याचा अधिकार नाही

ओआयसीला जम्मू-काश्मीरबद्दल बोलण्याचा अधिकार नाही

एकमत ऑनलाईन

जिनेव्हा : संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या ७६ व्या सत्रामध्ये झालेल्या बैठकीत इस्लामिक देशांच्या परिषदेने म्हणजेच ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनने (ओआयसी) भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्ज रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली. मात्र यावर भारताने इस्लामिक देशांच्या परिषदेला जशाच तसे उत्तर दिले आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने इस्लामिक देशांच्या परिषदेला या मंचाचा वापर आमच्या अंतर्गत गोष्टींबद्दल बोलून केवळ स्वत:च्या स्वार्थापोटी भाष्य करण्यासाठी केला जाऊ नये अशी इच्छा व्यक्त केली.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ऑगस्टमध्येच, ओआयसीला भारताचा अविभाज्य भाग असणा-या केंद्र शासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलेल्या जम्मू-काश्मीरबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, असे स्पष्ट केले होते. तसेच ओआयसीच्या मुख्यालयाला आम्ही पुन्हा एकदा सांगू इच्छितो की त्यांच्या मंचाचा वापर स्वत:च्या स्वार्थापोटी भारताच्या अंतर्गत गोष्टींवर भाष्य करणा-या सदस्यांना करुन देता कामा नये, असा थेट इशाराच भारताने दिला होता.

जम्मू-काश्मीर वाद १९४८ पासून
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरवर ओआयसीमधील परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर एक संयुक्त पत्रक जारी केले जाणार आहे. ही बैठक ओआयसीच्या महासचिवांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याचे सांगण्यात आलेले. याच बैठकीनंतर पाकिस्तानच्या इशा-यावर जारी केलेल्या पत्रकामध्ये ओआयसीने जम्मू-काश्मीरसंदर्भात आपली आधीची भूमिका कायम ठेवत असल्याचे म्हटले आहे. ओयओसीने जम्मू-काश्मीर हा सन १९४८ पासून एक मान्यप्राप्त आंतरराष्ट्रीय वाद आहे असेही म्हटले आहे.

 

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या