22.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयरूग्णालयाच्या बिलासाठी वृध्दाला ठेवले बांधून

रूग्णालयाच्या बिलासाठी वृध्दाला ठेवले बांधून

- मध्यप्रदेशातील खळबळजनक घटना

एकमत ऑनलाईन

शाजापूर: वृत्तसंस्था
मध्य प्रदेशातल्या शाजापूरमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका हॉस्पिटलने चक्क ८० वर्षांच्या आजोबांना बांधून ठेवले. हॉस्पिटलमधील बेडलाच त्यांना बांधण्यात आलें. या घटनेचा फोटोही समोर आला असल्याने खळबळ उडाली आहे.

८० वर्षाच्या आजोबांचे हात-पाय हॉस्पिटलने कॉटला बांधून ठेवले. उपचाराच्या बिलासाठी हॉस्पिटलने त्यांना बांधून ठेवल्याचा आरोप आहे. माध्यमांमध्ये वृत्त येताच जिल्हाधिका-यांनी या प्रकरणी चौकशीसाठी पथक रवाना केले आहे. या प्रकरणी पोलिसांची चौकशी सुरू आहे. तसेच, आम्हीही एक पथक तपासासाठी रवाना केले आहे. या प्रकरणी अहवाल आल्यानंतर त्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.

Read More  ‘आयपीएल’वरून ‘बीसीसीआय’मध्ये फूट?

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या