33.7 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home राष्ट्रीय तिसऱ्या टप्प्यात पोहोचणार ऑक्सफर्डची लस

तिसऱ्या टप्प्यात पोहोचणार ऑक्सफर्डची लस

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली – देशातील कोरोना स्थितीसंदर्भात मंगळवारी आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली. यावेळी त्यांनी कोरोना लसीवरही भाष्य केले. ते म्हणाले, देशात कोरोनाच्या तीन लसींवर काम सुरू आहे. यांपैकी एक लस आज अथवा उद्या परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचेल. मात्र, लस केव्हापर्यंत तयार होईल यासंदर्भात माहिती देण्यात आली नाही. याशिवाय, ऑक्सफर्डची कोरोना लस याच आठवड्यात परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचेल, असेही यावेळी आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

कोरोना लसीसंदर्भात नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी सांगितले, की “देशात कोरोनाच्या तीन लसींवर काम सुरू आहे. हे काम वेगवेगळ्या टप्प्यांवर सुरू आहे. यांपैकी एक लस आज अथवा उद्या परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचेल. आपण योग्य दिशेने पुढे जात आहोत.”

डॉ. व्हीके पॉल म्हणाले, “पंतप्रधान मोदी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी म्हणाले होते, की भारतात तीन लसी तयार केल्या जात असून वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांचे काम सुरू आहे. यांपैकी एक आज अथवा उद्या तिसऱ्या टप्प्यावर पोहोचेल. तर इतर 2 लसी परीक्षणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आहेत.”

निराशेचे मळभ दूर करून पोळा सण समृध्दी घेऊन येईल – अजित पवार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या