24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeराष्ट्रीयराजकारणात अपमानाला स्थान?

राजकारणात अपमानाला स्थान?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसमधील मतभेद शांत करण्याच्या प्रयत्नात असताना आता पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्वच वादात सापडले आहे. त्यामुळे, आता काँग्रेसमध्ये ‘राग आणि अपमान’ यावर युद्ध सुरू झाले आहे. राजकारण आणि राग यावर काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने दिलेल्या प्रतिक्रियेवरून पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी थेट काँग्रेस हायकमांडवर प्रहार केला आहे. जर राजकारणात रागाला स्थान नसेल तर मग अपमानाला आहे का? असा सवाल अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस नेतृत्वाला विचारला आहे. त्यामुळे, काँग्रेसमधील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

पंजाब काँग्रेसमधील कलह दूर करण्यासाठी हायकमांडने केवळ पक्षाचाच नव्हे तर राज्यातील सरकारचा चेहरामोहरा बदलला आहे. मात्र, काँग्रेसची चिंता कायमच आहे. कारण, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग हे सातत्याने संकेत देत आहेत की येत्या काळात ते काही मोठी पावले उचलू शकतात. यामुळे पक्षाच्या नेत्यांची अस्वस्थता वाढली आहे. अमरिंदर सिंग यांच्या आक्रमक स्वभावामुळे अगदी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासूनच काँग्रेस काळजीत असल्याचे म्हटले जाते. त्यातच कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आता काँग्रेस हायकमांडवर हा थेट हल्ला चढवला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या