तिरुअनंतपुरम : कालिकतहून सौदी अरेबियाच्या विमानाच तिरुअनंतपुरम विमानतळावर आपतक्कालीन लँडिंग करण्यात आले आहे. या विमानात १८२ प्रवासी होते. वेळीच घटना लक्षात आल्याने मोठा अपघात टळला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी एयर-इंडिया एक्स्प्रेस ३८५ या विमानाने कालिकत येथून सौदी अरेबियाच्या दम्मामकडे उड्डाणे केले होते. मात्र, उड्डाणावेळी विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला. यामुळे विमानाच्या हायड्रोलिक गियरमध्ये बिघाड झाला. यानंतर या विमानाचे १२.१५ वाजता तिरुअनंतपुरममध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. यावेळी विमानात १८२ प्रवासी प्रवास करत होते. अचानक विमान तिरुअनंतपुरमकडे वळवण्यात आल्याने येथील विमानतळावर आणीबाणी घोषित करण्यात आली होती.
टेकऑफवेळी विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळल्यानंतर वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत विमानातील इंधन अरबी समुद्रात रिकामे केले. त्यानंतर तिरूअनंतपुरम येथील विमानतळावर सुरक्षित लँडिंग केले. ज्यावेळी हे विमान तिरूअनंतपुरम विमानतळावर उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी संपूर्ण विमानतळावर आणीबाणी लागू करण्यात आली होती. दरम्यान, वैमानिकाच्याप्रसंगावधाने या विमानाचा मोठा अपघात टळला असून १८२ प्रवाशांची जीव वाचला आहे.