28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeराष्ट्रीयकेंद्राच्या योजना ग्रामपंचायत स्तरावर राबविणार

केंद्राच्या योजना ग्रामपंचायत स्तरावर राबविणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन बारामती’ला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रारंभ केला. त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २१ सप्टेंबरला बारामती दौ-यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सामान्यांपासून ते राजकरण्यापर्यंत सर्वांशी बोलून चर्चा करून एकूणच परिस्थितीचा आढावा घेतला होता.

दरम्यान निर्मला सीतारामन यांना असे आढळून आले की, केंद्र सरकारच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. यासाठी आता निर्मला सीतारामन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता केंद्र शासनाच्या विविध योजना आता थेट ग्रामपंचायत स्तरावर राबविण्याचा निर्णय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतला आहे.

बारामती दौ-यानंतर निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला हा पहिला मोठा दणका दिल्याचे मानले जात आहे. निर्मला सीतारामन तीन दिवसांसाठी बारामती दौ-यावर आल्या होत्या. यावेळी निर्मला सीतारामन यांनी परिवार सन्मान बैठक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिका-यांची बैठक, संघटनात्मक तयारी आढावा, मंडल आणि जिल्हा पदाधिका-यांबरोबर बैठका, सुकाणू समिती पदाधिकारी बैठक, मोर्चा पदाधिका-यांबरोबर संवाद, भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा, सहकारी आणि व्यापारी संस्थांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक, महिला मोर्चा आणि युवक पदाधिका-यांशी संवाद साधला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या