21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeराष्ट्रीयजम्मूमधील मंदिरांवर हल्ल्यांचा कट फसला

जम्मूमधील मंदिरांवर हल्ल्यांचा कट फसला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा जम्मूमधील मंदिरांवर हल्ला करण्याचा कट आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. राज्यात आणि देशात जातीय तणाव निर्माण करण्याचा त्यांचा त्यामागे उद्देश आहे. या अलर्टच्या पार्श्वभूमीवर जम्मूमध्ये सुरक्षा बंदोबस्त वाढण्यात आला आहे.

पाच ऑगस्ट किंवा स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्टला दहशतवादी संघटना मंदिरांवरील हल्ल्याचा कट प्रत्यक्षात आणू शकतात. पाच ऑगस्टला जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे अनुच्छेद ३७० रद्द करुन दोन वर्ष पूर्ण होणार आहेत. या पाक पुरस्कृत दहशतवादी संघटनांची जम्मूमधील मंदिरांजवळच्या गर्दीच्या ठिकाणी स्फोटके पेरण्याची योजना असू शकते, असे सुरक्षा अधिका-यांनी सांगितले. अलीकडेच जम्मूमधील आयएएफच्या बेसवर ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आला होता. यापूर्वी तीन वेळा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आहे, असे नॉर्थ ब्लॉकमधील वरिष्ठ अधिका-याने सांगितले. आयईडी पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर होऊ शकतो, असे दुस-या अधिका-याने सांगितले.

लवकरच कोव्हिशील्ड-कोव्हॅक्सीनची मिक्सिंग चाचणी?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या