23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयगाडीत पेट्रोल कमी असल्याने पोलिसाने ठोकला दंड

गाडीत पेट्रोल कमी असल्याने पोलिसाने ठोकला दंड

एकमत ऑनलाईन

तिरूअनंतपुरम : ट्रॅफिक पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने चलान कापल्याच्या घटना तुम्ही अनेकदा ऐकल्या किंवा पाहिल्या असतील, पण आता एक नवीन प्रकरण समोर आले आहे. जे खूपच रंजक आहे. यासंबंधी सोशल मीडियावर एक चलान पावती मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

केरळमधील निवृत्त मोटार वाहन विभागाचे निरीक्षक थंकाचन टीजे यांनी या घटनेबद्दल सांगितले की, त्यांना वाहतूक पोलिसांनी कापलेल्या या चलानचे फोटो आणि स्क्रीनशॉट प्राप्त होत आहे. या चलानमध्ये दुचाकीमध्ये पुरेसे इंधन नसल्यामुळे त्या व्यक्तीला दंड ठोठावण्यात आल्याचे दिसून येत असून ही घटना केरळमध्ये घडली आहे,

केरळ एमव्हीडीनेच हे चलान दिले आहे. अशा प्रकारे चलान कापण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे माजी एमव्हीडी निरीक्षकांनी सांगितले. तसेच केरळ मोटार वाहन कायदा किंवा सीएमव्हीआरमध्ये अशा प्रकारच्या कोणतेही कलमाबाबत ऐकलेले नाही, असे त्यांनी सांगितले.

इंधनाशी संबंधित हा नियम लागू आहे
थंकाचन पुढे म्हणाले की, अशाच प्रकरणाशी संबंधित आणखी एक गुन्हा आहे, जो अनेक लोक नकळत करतात. हे व्यावसायिक वाहनांना लागू होते. जे प्रवासासाठी वापरले जातात, असे कोणतेही वाहन, मग ते कार, व्हॅन, बस किंवा सार्वजनिक सेवेसाठी वापरण्यात येणारे कोणतेही वाहन असो, ज्यामध्ये इंधन भरण्यापूर्वी प्रवाशांना बाहेर काढणे आवश््यक आहे. चालक किंवा वाहन मालकाने तसे न केल्यास त्याला २५० रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. हा नियम फक्त व्यावसायिक वाहनांना लागू आहे खाजगी वाहनांना नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या