22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeराष्ट्रीयपोलिसांनी सरकारी कार्यक्रमाचे बॅनर काढून मोदींच्या फोटोचे बॅनर लावले

पोलिसांनी सरकारी कार्यक्रमाचे बॅनर काढून मोदींच्या फोटोचे बॅनर लावले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीचे केजरीवाल सरकार आणि एलजी यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. दिल्ली सरकारच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे पोस्टर जबरदस्तीने लावले जात असल्याचा आरोप केजरीवाल सरकारने केला आहे. तसेच दिल्ली पोलिसांनी कार्यक्रमापूर्वी केजरीवाल यांचे फोटो काढून पीएम मोदींचे पोस्टर लावले. तसेच मोदींचे बॅनर काढल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांकडून देण्यात आल्याचा आरोप आम आदमी पक्षाने करण्यात आले आहे.

दिल्ली सरकारच्या वतीने वन महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये सीएम केजरीवाल आणि एलजी दोघे उपस्थित राहणार होते. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय म्हणाले, आम्हाला भांडण नको. मात्र सरकारी कार्यक्रमाला राजकीय बनवण्यात आले. त्यामुळे मी आणि मुख्यमंत्री दोघेही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. दिल्ली सरकारच्या अधिकृत कार्यक्रमात शनिवारी रात्री पोलिसांना पाठवण्यात आले. पीएमओच्या सूचनेनुसार हे पोलिस पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी मंचाचा ताबा घेतला आणि कार्यक्रमाच्या बॅनरऐवजी पीएम मोदींचा फोटो असलेला बॅनर लावला आणि तो हटवल्यास कारवाई केली जाईल, असे सांगितले.

वन महोत्सव कार्यक्रम वादात
११ जुलैपासून दिल्लीत वन महोत्सव सुरू होता, त्याअंतर्गत दिल्लीत वृक्षारोपण करण्यात येत होते. आज वनमहोत्सवाची सांगता होती. यानिमित्ताने असोला भाटी येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी एलजी आणि मुख्यमंत्री केजरीवाल उपस्थित राहणार होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या