22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeराष्ट्रीयमहागाई वाढण्याची शक्‍यता असल्यामुळे व्याजदरात कपातीची शक्‍यता कमी

महागाई वाढण्याची शक्‍यता असल्यामुळे व्याजदरात कपातीची शक्‍यता कमी

एकमत ऑनलाईन

मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने शक्‍य होती तेवढी व्याजदर कपात केली आहे. आता महागाई वाढण्याची शक्‍यता असल्यामुळे रिझर्व्ह बॅंक व्याजदरात कपात करू शकणार नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारलाच पुढाकार घ्यावा लागेल, असे स्टेट बॅंकेच्या अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे.

पतधोरण समितीच्या बैठकीतील इतिवृत्तावर प्रतिक्रिया व्यक्‍त करताना स्टेट बॅंकेच्या अर्थतज्ज्ञांनी सांगितले की, आता यापुढे महागाईचा दर कमी होण्याची शक्‍यता नाही. त्यामुळेच रिझर्व्ह बॅंकेने या अगोदर जाहीर झालेल्या पतधोरणात व्याजदरात कपात केली नाही.

मार्च महिन्यापासून बॅंकेने आपल्या रेपोदरात तब्बल 1.15 टक्‍क्‍यांची कपात केली आहे. जुलै महिन्यात किरकोळ महागाईचा दर 6.89 टक्‍के झाला आहे. तो रिझर्व्ह बॅंकेने ठरविलेल्या चार टक्‍केपेक्षा कितीतरी जास्त आहे. करोना व्हायरसमुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. तो इतक्‍यात कमी होणार नाही. त्याचबरोबर दरम्यानच्या काळामध्ये इंधनाचे दर वाढले असल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढला आहे. या कारणामुळे महागाई वाढत राहण्याची शक्‍यता आहे, असे या अहवालात नमुद करण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियाची लशीची पहिली मानवी चाचणी यशस्वी झाली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या