23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeराष्ट्रीयनिष्काळजीने कोरोनाच्या तिस-या लाटेची शक्यता

निष्काळजीने कोरोनाच्या तिस-या लाटेची शक्यता

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसºया लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. याच दरम्यान देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. लाखो लोकांनी कोरोना लस घेतली आहे. मात्र लस घेतल्यानंतर देखील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. निष्काळजीमुळे अनेकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे.

लस घेतल्यानंतरही कोणती लक्षणे आढळून येतात. यापासून कसा बचाव करायचा हे जाणून घेऊया. डॉक्टरांनी याबाबत मोलाचा सल्ला दिला आहे. कोरोना लस घेतल्यानंतर अनेकांना वाटते संसर्ग होत नाही. मात्र असे काही नाही. लागण होऊ शकते. कोरोना लस घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतरही घशात खवखव होणे, वास न येणे, डोकेदुखी, शिंका येणे अशी काही लक्षणे आढळून येत असल्याचे दिसून येत आहेत. कोरोना लसीचा डोस घेतल्यानंतरही मास्क लावणे अत्यंत गरजेचे आहे. घरी राहून स्वत:ची काळजी घ्या, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका. सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करा. आपले हात साबण आणि सॅनिटायझरच्या मदतीने नेहमी स्वच्छ करत राहा. बाहेरून घरी आल्यानंतर अंघोळ करा. सार्वजनिक ठिकाणी, दुकान, मॉल, आॅफिसमध्येही कोरोना नियमावलीचे पालन करा, लहान मुलांची विशेष काळजी घ्या असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

दोन डोसमधील योग्य अंतर फायद्याचे
फायजर-बायोएनटेक लसीच्या दोन डोसमध्ये अधिक अंतर ठेवल्यास अँटीबॉडी आणि टी-सेल विकसित रोगप्रतिकारक शक्ती वाढणार असल्याचे ब्रिटीश संशोधकांनी म्हटले आहे. रिसर्चमधून ही माहिती समोर आली आहे.

दुस-या डोस आवश्यकच
आॅक्सफोर्ड विद्यापीठाच्या नेतृत्वात बर्मिंघम, न्यू कॅसल, लिव्हरपूल आणि शेफिल्ड विद्यापीठांनी आणि ब्रिटन कोरोना व्हायरस इम्यूनोलॉजी कंसोर्टियमच्या मदतीने फायजर-बायोएनटेकच्या लसीबाबत सखोल संशोधन करण्यात आले. आरोग्य कर्मचाºयांवर करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, टी सेल आणि अँटीबॉडीचा स्तर पहिल्या आणि दुसºया डोसमध्ये अंतर ठेवले तरी अधिक असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. जागतिक पातळीवर करण्यात आलेल्या संशोधनानुसार, लसीचे दोन डोस घेण्याच्या दरम्यानच्या काळात कोरोनापासून बचाव होतो आणि लसीच्या दुसºया डोसची आवश्यकता आहे.

लसीनंतर अँटीबॉडी आणि टी-सेलचे आकलन
शेफील्ड विद्यापीठाच्या संसर्गजन्य आजाराचे वरिष्ठ चिकित्सा प्रवक्ते आणि प्रमुख संशोधक डॉ. तुषाण डी सिल्वा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्स-सीओव्ही-२ लसीनंतर अँटीबॉडी आणि टी-सेलचे आकलन या संशोधनात करण्यात आले. या संशोधनात ५०३ आरोग्य कर्मचा-यांचा समावेश करण्यात आला होता.

राहुल गांधींचे ट्रॅक्टर्स पोलिसांनी थांबविले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या