27.3 C
Latur
Monday, January 30, 2023
Homeराष्ट्रीयपेट्रोलची किंमत इतर देशांच्या तुलनेत सर्वांत कमी

पेट्रोलची किंमत इतर देशांच्या तुलनेत सर्वांत कमी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात पेट्रोलची किंमत दुस-या देशांच्या तुलनेत सर्वांत कमी असल्याचे वक्तव्य संसदेत केल्यानंतर विरोधक चांगलेच पेटले असून या वक्तव्याचा विरोधकांनी निषेध केला आहे.

पेट्रोल डिझेलच्या दरांवरून सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आहे. विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की देशातील पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर आहेत. यांचसंदर्भात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संसदेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. सध्याची जागतिक परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमती लक्षात घेता, पेट्रोलच्या किमती इतर देशांच्या तुलनेत देशात सर्वात कमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. २०२१ ते २०२२ दरम्यान, आंतरराष्ट्रीय किमतीत झपाट्याने वाढ झाली असतानाही भारतात पेट्रोलचे दर केवळ दोन टक्क्यांनी वाढले आहेत.

गुरुवारी संसदेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री म्हणाले की केंद्राने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर काही राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी व्हॅट कमी केला होता, तर काही भाजप विरोधी राज्यांनी केला नाही. पुढे बोलताना पुरी म्हणाले की मी सांगू इच्छितो की, अद्याप पश्चिम बंगाल, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ आणि झारखंडने त्यांच्या दरात कपात केलेली नाही.

केंद्र सरकारने दोनदा व्हॅट कमी केला
पेट्रोलियम मंत्री म्हणाले की पेट्रोल पंपावरील किंमत वाजवी पातळीवर ठेवण्यासाठी केंद्र सरकारने नोव्हेंबर २०२१ आणि मे २०२२ मध्ये उत्पादन शुल्कात दोनदा कपात केली आहे. पुरी पुढे बोलताना म्हणाले की मला तुम्हाला सांगण्यात आनंद होतोय की, काही राज्यांनीही व्हॅट कमी केला आहे. आता आमची अशी परिस्थिती आहे की, काही राज्ये १७ रुपये दराने व्हॅट आकारत आहेत आणि इतर भाजप विरोधी राज्य ३२ रुपये दराने व्हॅट आकारत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या