नवी दिल्ली : कोरोना आणि लसीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शुक्रवार दि़ ४ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक झाली. पीएम मोदी यांनी या बैठकीत लसीबद्दल मोठी माहिती दिली आहे. कोरोना लस प्रथम वृद्ध, कोरोना वॉरियर्सना दिली जाऊ शकते, असे पंतप्रधान मोदींनी सूचित केले असून, सर्व राज्यांशी चर्चा केल्यानंतर लसीची किंमत ठरविण्यात येणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले़ कोरोनाच्या लसीचे काम वेगाने सुरू आहे. ८ लसीवर सध्या वेगाने काम सुरू असून, लवकरच त्या उपलब्ध होणार आहेत. येत्या आठवड्यांमध्ये ही लस येणे अपेक्षित आहे.
ब्रिटनमध्ये पुढच्या आठवड्यात नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. पण भारतातील नागरिकांना कोरोनाची लस कधी मिळणार आणि किंमत किती असणार हा प्रश्न पडला आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्व पक्षांची बैठक घेतली. कोरोना लसीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण बैठक असल्याचे सांगितले जात आहे़
येत्या काही आठवड्यात लस येणार?
सर्वपक्षीयांच्या बैठकीत पीएम मोदी म्हणाले की आठ लसींवर सध्या काम सुरू आहे. येत्या काही आठवड्यांमध्ये लसीबाबत चांगली बातमी येईल, अशी अपेक्षा आहे. शास्त्रज्ञांकडून मान्यता मिळाल्यानंतर लवकरच त्यावर काम सुरू होईल. भारत एका विशेष सॉफ्टवेअरवर काम करत आहे जे प्रत्येक नागरिकापर्यंत लस पोहोचते का यावर लक्ष ठेवेल. लसीचे वितरण कसे करता येईल आणि त्याचे स्टोअरेज करण्यासाठी कसे नियोजन करता येईल, यावर सध्या काम सुरू आहे.
दिल्लीत रात्रीची संचारबंदी नाही : केजरीवाल