27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeराष्ट्रीयपंतप्रधानांनी जवानांना शेतक-यांविरोधात उभे केले

पंतप्रधानांनी जवानांना शेतक-यांविरोधात उभे केले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : वादग्रस्त शेती कायद्यांविरोधातील शेतकºयांचा सातत्यपूर्ण संघर्ष आणि दिल्ली गाठण्याच्या निर्धारासमोर नमते घेत शुक्रवारी अखेर केंद्र सरकारने आंदोलकांना दिल्लीत प्रवेश करण्यास परवानगी दिली. तसेच, दिल्लीच्या उत्तर-पश्चिम टोकाला असलेल्या बुराडी येथील निरंकारी मैदानावर शांततेने निदर्शन करण्याची मुभा देण्यात आली. शुक्रवारी संध्याकाळी शेतकºयांचे जथ्थे येऊ लागले होते. दरम्यान, आंदोलनातील एक फोटो शेअर करत काँग्रेचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

शनिवारी काँग्रेसने शेतकºयांच्या मुद्यावर केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. एकीकडे राहुल गांधी यांनी शेतकºयांच्या विरोधातील सरकारची कारवाई ही पंतप्रधानांचा अहंकार असल्याचे म्हटले. तर दुसरीकडे काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गाँधी यांनी भाजपावर आरोप करत भाजपा सरकार आपल्या अब्जाधीश मित्रांसाठी सर्वकाही करतात परंतु जर शेतकरी दिल्लीत येत असतील तर त्यांच्या मार्गांवर अडथळे निर्माण केले जात जातात, असे म्हणत निशाणा साधला.

‘जय जवान जय किसान’ नावालाच
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. हा खुपच दु:खद फोटो आहे. आम्ही जय जवान जय किसानची घोषणा दिली होती. परंतु पंतप्रधानांच्या अहंकाराने जवानांना शेतकºयांच्या विरोधात आणून उभे केले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे़

शेतक-यांची अडवणूक चुकीची : प्रियंका गांधी
भाजपा सरकारच्या काळात देशातील परिस्थिती पाहा. जेव्हा भाजपाचे अब्जाधीश मित्र दिल्लीत येतात तेव्हा त्यांच्यासाठी लाल चादर पसरली जाते. परंतु शेतकºयांना दिल्लीत येताना रस्त्यात अडथळे निर्माण केले जातात. त्यांनी शेतकºयांच्या विरोधात कायदे तयार केले ते चालते. परंतु सरकारसमोर ते आपले म्हणणे मांडण्यासाठी आले तर ते चुकीचे?, असे म्हणत प्रियंका गांधी यांनीही सरकारवर टीकेचा बाण सोडला.

देशातील पाचशे संघटना एकवटल्या
संयुक्त किसान मोर्चा या बॅनरखाली पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान केरळ, महाराष्ट्र अशा विविध राज्यांतील पाचशे शेतकरी संघटना एकत्र आल्या होत्या. तर दुसरीकडे केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी कोरोनाच्या काळातील हे आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले आहे. शेतकरी संघटनांना चर्चेसाठी ३ डिसेंबरला बोलावले असल्याचा तोमर यांनी पुनरुच्चार केला.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या