34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeराष्ट्रीयपंतप्रधानांनी घेतला करोना लसीचा दुसरा डोस

पंतप्रधानांनी घेतला करोना लसीचा दुसरा डोस

एकमत ऑनलाईन

मुंबई : देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली आहे. दरम्यान, या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनाची लस घेतली होती. ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण या तिसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे. या टप्प्याची सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सकाळी सातच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयामध्ये लसीची पहिला डोस घेतला होता. तर आज करोना लसीचा दुसरा डोस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्स रुग्णालयात घेतला आहे. यासंदर्भातील फोटो मोदींनीच ट्विट केला आहे.

याबाबत त्यांनी ट्विट केले आहे की,’मी आज एम्स रुग्णालयात करोना लसीचा दुसरा डोस घेतला. करोनाला हरवण्यासाठी असणाऱ्या पर्यायांपैकी लसीकरण हा एक मार्ग आहे. जर तुम्ही करोना लसीसाठी पात्र असाल तर लवकरच डोस घ्या. http://CoWin.gov.in वर रजिस्टर करा’.

पहिल्या टप्प्यात साधारणत: 1.5 कोटी लोकांना ही लस देण्यात आली. सोमवारपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी सरकारी तसंच खाजगी हॉस्पिटलमध्ये यंत्रणा उभारण्यात आली आहे. लस घेण्यासाठी नाव नोंदणी करणं आवश्यक आहे. कोणाला लस मिळू शकते यासंदर्भात नियमावली जारी करण्यात आली आहे.

शरद पवार यांनी पण घेतला दुसरा डोस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी बुधवारी कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला. 1 मार्च रोजी साहेबांनी लशीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर एक महिन्याने त्यांनी दुसरा डोस घेतला आहे.

सोलापूर जिल्ह्यात लॉकडाऊनच्या विरोधात व्यापारी रस्त्यावर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या