31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeराष्ट्रीयमार्चमध्ये शहरी बेरोजगारीची समस्या गंभीर

मार्चमध्ये शहरी बेरोजगारीची समस्या गंभीर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून देशभरात कोरोनाने कहर माजविला होता. कोरोनानियंत्रणासाठी लॉकडाऊन पुकारण्यात आला. मात्र त्यामुळे कोरोनाचे संकट तर टळले नाहीच; मात्र बेरोजगारीने अक्षरक्ष: भस्मासुराचे रुप धारण केले. ऑगस्ट २०२० पासून अनलॉक सुरु झाले व ऑक्टोबर महिन्यापासून अर्थव्यवस्था काहीशी रुळावर येऊ लागली. मात्र मार्च २०२१ पासून पुन्हा वेगाने कोरोना वाढू लागल्याने पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे. मात्र अद्यापही बेरोजगारी विशेषत: शहरी भागातील बेरोजगारी वाढतच असल्याचे दिसून येत आहे. सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमी या संस्थेने जारी केलेल्या मासिक आकडेवारीनूसार मार्च २०२१ मध्ये शहरी बेरोजगारी फेब्रुवारी महिन्यापेक्षा २५ आधार अंकांनी वाढून ७.२४ टक्के इतकी झाली आहे. शहरातील महिलांची बेरोजगारी वाढून १९.०७ टक्के इतकी झाली आहे.

दिल्ली विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक अरुप मित्रा यांच्या मतानूसार साथीच्या दुस-या लाटेचा फटका किरकोळ विक्री आणि आतिथ्य क्षेत्राला बसला आहे. वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यू यांच्यामुळे लोकांच्या हालचालींवर नियंत्रण आले आहे. त्यातून लोकांचे उत्पन्न घटून देशांतर्गत मागणीतही घट झाली आहे. उद्योगक्षेत्रही अजून संकटांशी झुंजत आहे. हे सगळे एकमेकांशी निगडीत असल्यामुळे शहरी बेरोजगारीत मोठी वाढ झाली आहे.

मार्चमध्ये ३० लाख शहरी बेरोजगार वाढले
सीएमईआयने जारी केलेल्या आकडेवारीनूसार शहरी बेरोजगारीने मोठी चिंता निर्माण केली आहे. सध्या श्रमशक्ति सहभागिता दर घसरला असून त्यातून श्रम बाजारातील कमजोरी समोर येत आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये श्रमबाजारातून ३ दशलक्ष लोक कमी झाले आहेत. अर्थव्यवस्थेत प्रत्यक्ष काम करणारे आणि काम शोधणारे प्रौढ नागरिक यांच्या प्रमाणाला एलएफपीआर असे म्हणतात.

शहरांपेक्षा ग्रामीण भागात अधिक रोजगार
देशाची एकुण श्रमशक्ती घसरुन ४२५.७९ दशलक्षांवर आली आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत ती २.७ दशलक्षांनी कमी आहे. यात ग्रामीण भागातील श्रमिकांचा वाटा भरपूर आहे. अर्थव्यवस्थेत पुरेशा प्रमाणात रोजगार निर्मिती होत नसल्याचे मार्चमध्ये श्रमबाजार व एलएफपीआरमध्ये झालेल्या घसरणीमध्ये दिसून आले. सन्मानजनक नौक-या नसल्यामुळे लोक श्रमबाजारापासून दूर राहात आहेत, असे संकेतही या आकडेवारीतून दिसून येत आहेत.

आकडेवारीत विसंगतता चिंतेची
एकीकडे सीएआयईच्या आकेडवारीत शहरी बेरोजगारीचा दर वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रीय बेरोजगारीचा दर मार्चमध्ये ६.५२ टक्क्यांनी घटल्याचे म्हटले आहे. मात्र श्रम बाजारातील स्थिती पाहता ही आकडेवारी दिशाभुल करणारी असू शकते. सीएमआयईच्या आकडेवारीनूसार फेब्रुवारीत ४०.५ टक्के असणारा एलएफपीआर मार्चमध्ये घसरुन ४०.१७ टक्के इतका झाला. हा मागील ४ महिन्यातील निचांक आहे. जानेवारीत तो ४०.६ टक्के, डिसेंबरमध्ये ४०.५६ टक्के, नोव्हेंबरमध्ये ४०.८० टक्के होता. शहरी भारतात एलएफपीआर ३७.७५ टक्क्यांवरुन घसरुन ३७ टक्क्यांवर आला आहे. मात्र दोन्ही आकड्यांमध्ये विसंगतता दिसून येत आहे.

लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी; ब्रिटनमध्ये ७ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या