21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeआंतरराष्ट्रीयनीरव मोदीपुढील अडचणी वाढणार

नीरव मोदीपुढील अडचणी वाढणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : पीएनबी घोटाळयातील प्रमुख आरोपी फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या अडचणीत वाढ होणार आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या खटल्यांमध्ये आता नीरवची छोटी बहिण आणि मेव्हण्याने त्याच्याविरोधात साक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या विशेष पीएमएलए कोर्टात या दोघांनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज दाखल झाला असून तो कोर्टाकडून मंजुरही करण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात नीरवची बहिण पूर्वी मेहता आणि त्यांचे पती मयंक मेहता यांनी कोर्टासमोर एक अर्ज सादर केला होता. या अर्जात त्यांनी म्हटलं होतं की, त्यांना नीरव मोदीपासून दूर रहायचं आहे. तसेच त्याच्या आणि त्याच्या व्यवहारांशी संबंधित काही महत्वाचे आणि पक्के पुरावे देऊ शकतो. पूर्वी यांच्याकडे बेल्जिअमची नागरिकता असून त्यांचे पती मयंक हे ब्रिटीश नागरिक आहेत.

नीरव मोदीच्या कथीत गुन्हेगारी कृत्यांमुळे त्यांच्या खासगी आणि व्यावसायिक जीवनाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आम्ही इडीशी संबंधित मनी लँडिंगच्या दोन प्रकरणांध्ये साक्षीदार बनू इच्छितो. त्याचबरोबर असे काही खुलासे करु शकतो जे नीरव आणि इतर आरोपींविरोधात आरोप सिद्ध करण्यात महत्वाचे ठरु शकतात, असे दोघांच्यावतीने कोर्टात सांगण्यात आले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे लावण्यात आलेले प्रतिबंध आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावर लागलेल्या बंदीमुळे भारतात येऊ शकलो नाही. पण आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्ंिसगद्वारे कोर्टासमोरही आपला जबाब देऊ शकतो. यापूर्वी आॅक्टोबरमध्ये देखील इडीला दिलेल्या जबाबात दोघांनी चौकशीत पूर्ण सहकार्य करण्याचे सांगितले होते,असेही पूर्वी आणि मयंक यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे.

कोरोना मृत्यूंच्या संख्येत भारत तिस-या स्थानावर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या