21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयकच्च्या कैद्यांच्या सुटकेची प्रक्रिया वेगवान व्हावी

कच्च्या कैद्यांच्या सुटकेची प्रक्रिया वेगवान व्हावी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : न्यायाच्या प्रतीक्षेत ज्यांच्या आयुष्यातील वर्षानुवर्षे कारागृहाच्या गजाआड जातात अशा देशातील कच्च्या कैद्यांच्या(अंडर ट्रायल) लवकर सुटकेची प्रक्रिया वेगवान करावी असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्याययंत्रणेला केले आहे. न्यायाची प्रक्रिया सरळ व सुलभ असावी अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या उद्घाटन कार्यक्रमात मोदी बोलत होते. सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा व अन्य मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातील ७० हून जास्त जिल्हा व सत्र न्ययाधीशही यानिमित्त होणा-या परिषदेत सहभागी झाले आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृतकाळात उद्योग-व्यवसायातील सुलभता (ईझ ऑफ डुईंग बिझिनेस) जगण्यातील सुलभता (ईझ ऑफ लिव्हिंग) याचबरोबर न्याय मिळण्यातील सुगमपणाही देशवासीयांसाठी गरजेचा असल्याचे सांगून (‘ईझ ऑफ जस्टिस’) पंतप्रधान म्हणाले की देशातील विविध कारागृहांत बंदिस्त असलेल्या आणि कायदा मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या अंडरट्रायल कैद्यांच्या सुटकेची प्रक्रिया वेगवान करावी. नव्याने सुरू झालेली ही जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे अशा कच्च्या कैद्यांना कायदेशीर मदत देण्याची जबाबदारी घेऊ शकतात. जिल्हा न्यायाधीशांनी प्रलंबित खटल्यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या कार्यालयांचा वापर करून कच्च्या कैद्यांची लवकरात लवकर सुटका होण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी.

बार कौन्सिल ऑफ इंडियाने यासंदर्भात मोहीम सुरू केली आहे त्यात त्यांनी अधिकाधिक वकिलांना सहभागी करून घ्यावे. पंतप्रधान म्हणाले, देशातील न्यायालयांत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सारख्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी गेल्या ८ वर्षांत जलद गतीने काम झाले आहे, दुर्बलातील दुर्बल व्यक्तीलाही न्याय मिळावा हा त्यामागील उद्देश आहे. न्याय वितरणात न्यायिक पायाभूत सुविधाही महत्त्वाची भूमिका बजावतात.अशा सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी ९००० कोटी रुपये खर्च केले जात आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या