21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीय‘ड्रॅगन’ची मागे हटण्याची प्रक्रिया कासवगतीने

‘ड्रॅगन’ची मागे हटण्याची प्रक्रिया कासवगतीने

एकमत ऑनलाईन

लेह: चिनी सैन्य माघारी फिरण्यास सुरुवात झाल्यानंतर विशेष रणनितीक गटाची झालेली ही पहिली बैठक आहे. लडाखच्या गलवान भागातील पेट्रोलिंग पॉर्इंट १४ (गलवान खोरे), पेट्रोलिंग पॉर्इंट १५ (हॉट स्प्रिंग) आणि पेट्रोलिंग पॉर्इंट १७ (गोग्रा) येथून चिनी सैन्य माघारी फिरले आहे. चीनने या भागातून आपले वाहने, तंबू, सैन्य हटवले आहे. पण पँगाँग टीएसओ सेक्टरमध्ये मात्र चिनी सैन्य मागे हटण्याची प्रक्रिया अत्यंत धीम्यागतीने सुरु आहे.

खास चीनसाठी बनवण्यात आलेल्या विशेष रणनितीक गटाची दि़ ८ जुलै रोजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. पूर्व लडाखमध्ये एकूणच चार ठिकाणी संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. तिथून आता चिनी सैन्याची माघारी फिरण्याची प्रक्रिया सुरु आहे. या बैठकीत एकंदर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला व सरकारचे पुढचे पाऊल ठरवण्यासंबंधी चर्चा झाली.

अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चीनचा डोळा
आक्रमक विस्तारवादी भूमिका घेणाºया चीनने आता आपले लक्ष अरुणाचलकडे वळवले आहे. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ रस्ते बांधण्यास भारताला रोखणारा चीन आता अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर रस्ते तयार करत असल्याचे समोर आले आहे. यासाठी चीन सर्व प्रकारच्या भागात काम करण्यास सक्षम असलेल्या साधनांचा वापर करीत आहे. या यंत्रांना स्पायडर एक्स्ववेटर असेही म्हटले जाते.

ब्रम्हपुत्र नदीजवळ हा रस्ता बनवला जात असून, या मार्गातून भारतात प्रवेश केला जातो. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, पीएलएच्या तिबेट मिलिट्री डिस्ट्रिक्ट व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओनुसार, ब्रम्हपुत्र नदीजवळ चिनी सैनिक अतिशय वेगाने रस्तेबांधणीचे काम करत आहेत. या कामात स्पायडर एक्स्ववेटर वापरण्यात येत असून त्याच्या वापराने डोंगराळ भागात रस्ते सहजपणे तयार करता येतात. चीनमध्ये ब्रह्मपुत्र नदीला यार्लंग नदी म्हणतात.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पायाभूत सुविधांची उभारणी
चीनी सैन्य भारताला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पायाभूत सुविधा जलदगतीने उभारत आहे. भारतही चीनच्या या कृतीला प्रत्युत्तर म्हणून या भागात रस्ते आणि पायाभूत सुविधासुद्धा विकसित करत आहे. त्यामुळे अनेकदा दोन्ही देशांमध्ये वाद होत असतात. लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भारताने बांधकाम करण्यास सुरुवात केल्यानंतर चीनने त्यावर आक्षेप घेतला. लडाखच्या आधी डोकलाममध्ये ही असाच वाद झाला होता.

फिंगर फोर कळीचा मुद्दा
पँगाँगमधील फिंगर फोर हा पहिल्यापासून कळीचा मुद्दा राहिला आहे. चीनने फिंगर फोरपर्यंत रस्ता बांधणी केली आहे़ तसेच बंकर, पीलबॉक्स, टेहळणी चौकी सुद्धा उभारली आहे. फिल्ड रिपोर्ट्सनुसार पूर्व लडाखमध्ये चिनी हवाई दलाच्या फायटर विमानांची उड्डाणे कमी झाली आहेत. पण जमिनीवर चिनी सैन्य पूर्णपणे सज्ज आहे. अरुणाचल प्रदेश जवळच्या एलएसीवरही चीनने सैन्याची जमवाजमव केली आहे.

डेपसांगमध्ये अजूनही चिनी सैन्य
गलवान भागाच्या तुलनेत डेपसांगमध्ये अजूनही चिनी सैन्य मागे हटलेले नाही. १७ हजार फूट उंचावर असलेल्या डेपसांगमध्ये चिनी सैन्याची आक्रमक भूमिका कायम आहे. डेपसांग राकी नाला भागात चीनने घुसखोरी केल्यामुळे भारतीय सैन्याला पॉर्इंट १०, ११, ११ए आणि १३ पर्यंत पेट्रोलिंग करता येत नाहीय. पँगाँग टीएसओ आणि डेपसांगमधील चिनी सैन्याच्या हालचालींवर भारतीय सैन्याचे अत्यंत बारीक लक्ष आहे. भारताने सुद्धा या भागात पूर्ण सज्जता ठेवली आहे.

Read More  चिनी आयात टप्प्याटप्प्याने थांबवा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या