37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeराष्ट्रीयबाजारात बनावट फास्टॅगचा सुळसुळाट

बाजारात बनावट फास्टॅगचा सुळसुळाट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जर आपण आपल्या कारमध्ये फास्टॅग देखील इन्स्टॉल केले असेल किंवा फास्टॅग खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी एक मोठी बातमी आहे. आता फास्टॅगमध्ये देखील फसवणूकीची प्रकरणे समोर आली आहेत. नॅशनल हायवे ऍथॉरिटी ऑफ इंडियाने (एनएचआय) लोकांना बनावट फास्टॅगबाबत इशारा दिला आहे. एनएचआयने म्हटले आहे की, काही फसवणूक करणा-यांनी बनावट फास्टॅगची विक्री ऑनलाइन केली आहे. खरे तर, या फसवणूक करणा-यांनी एनएचआय/आयएचएमसीएलसारख्या बनावट फास्टॅगची विक्री सुरू केली आहे. हे फास्टॅग वास्तविक दिसत आहेत परंतु ते बनावट आहेत. अशा परिस्थितीत युझर्सनी अशी फसवणूक टाळण्याची गरज आहे.

एनएचआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की जर आपण चुकून बनावट फास्टॅग विकत घेतले असेल तर आपण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हेल्पलाइन नंबर १०३३ वर कॉल करून तक्रार करू शकता. सरकारने १५ फेब्रुवारी २०२१ पासून देशभरात फास्टॅग अनिवार्य केले आहे. त्यानंतर अशा वाहनांना टोल प्लाझावर दुहेरी शुल्क भरावे लागेल ज्यांच्याकडे फास्टॅग नाहीत. डिजिटल मोडच्या माध्यमातून शुल्क भरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, वेळ वाचविणे तसेच, इंधनाचा वापर कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे.

येथून खरे फास्टॅग खरेदी करा
एनएचआयने सांगितले की ग्राहक लिस्टेड बँक आणि अधिकृत एजंटांकडूनच फास्टॅगची खरेदी करू शकतील. आयएचएमसीएल वेबसाइटवर फास्टॅग संबंधित माहिती देखील दिली गेलेली आहे.

फास्टॅगसाठी किती किंमत आहे
फास्टॅगची किंमत कोणत्याही व्यत्ययाशिवाय टोल प्लाझा ओलांडण्यासाठी आपल्या वाहनावर अवलंबून असते. याशिवाय त्याची किंमत जारी करणा-या बँक आणि सिक्योरिटी डिपॉजिट पॉलिसी द्वारेही याचे शुल्क निश्चित केले जाते. जर तुम्ही पेटीएमकडून कारसाठी फास्टॅग विकत घेतले तर तुम्हाला ५०० रुपये द्यावे लागतील. त्यात २५० रुपये रिफंडबेल सिक्योरिटी डिपॉजिट आणि १५० किमान शिल्लक आहे. आपण आयसीआयसीआय बँकेतून खरेदी केल्यास तुम्हाला फास्टॅगसाठी ९९.१२ रुपये आणि किमान शिल्लक २०० रुपये ठेवावे लागतील. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने फास्टॅगची किंमत १०० रुपये निश्चित केली आहे. याशिवाय २०० रुपयांची सिक्योरिटी डिपॉजिट द्यावी लागेल.

 

दीदींकडून बंगालचा विश्वासघात; पंतप्रधान मोदींची टीका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या