27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयजन्मल्यानंतर 20 मिनिटातच नाचू लागले हत्तीचे पिल्लू

जन्मल्यानंतर 20 मिनिटातच नाचू लागले हत्तीचे पिल्लू

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सोशल मीडियावर एक व्हिडिओ वायरल होत आहे. या व्हिडिओत हत्तीणीने एका बाळाला जन्म दिला आणि त्याच्या 20 मिनिटानंतर ते आपल्या आईसोबत नाचू लागल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर हत्ती आणि त्याच्या बाळाचा व्हिडिओ वेगाने वायरल होत आहे, हा व्हिडिओत बघणे यासाठी खास आहे की, हे बाळ जन्मल्यानंतर 20 मिनिटातच उभे राहून नाचू लागले. या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, हत्तीचे हे बाळ जमिनीवर व्यवस्थित उभे राहू शकत नाही, पण तरीही ते डान्स करण्याचा प्रयत्न करत आहे.

हा व्हिडिओ इंडियन फॉरेस्ट ऑफिसर सुशांता नंदा यांनी शेयर केला आहे. सोबत कॅपशनमध्ये लिहिले आहे, हत्तीचे बाळ 20 मिनिटापूर्वी जन्माला आले आहे आणि पहा कशाप्रकारे डान्स करत आपल्या जन्माचा आनंद साजरा करत आहे. आता या पायांना किती लांबचा पल्ला गाठवा लागेल.

व्हिडिओ मनाला समाधान देत आहे : ही पोस्ट लाखो लोकांनी पाहिली. आतापर्यंत असंख्य लाइक्स आणि रिट्वीट मिळाले आहेत. केरळात नुकत्याच झालेल्या गरोदर हत्तीणीच्या हत्येनंतर हा हत्तीन आणि तिच्या बाळा व्हिडिओ मनाला समाधान देत आहे.

Read More  राखेतून कोळसा तयार करण्यात यश : संशोधनासाठी सरकारकडून पेटंट

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या