24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeराष्ट्रीयसीमेवर पुन्हा चिनी सैन्याच्या वेगवान हालचाली

सीमेवर पुन्हा चिनी सैन्याच्या वेगवान हालचाली

- हेलिकॉप्टरच्या फेºया सुरूच - सैन्याची जमवाजमव आणि सराव

एकमत ऑनलाईन

लडाख: सीमावाद शांततेने सोडविण्याच्या चर्चेनंतरही चीनची खाज कमी झाली नसून, त्याने लडाखच्या पुर्वेकडील वास्तविक नियंत्रण सीमेवर आपले एमआय १७ एस या हेलिकॉप्टरच्या अनेक घिरटया मारत आहेत.

लडाखमधील सीमावाद शमवण्यासाठी एकीकडे कमांडर स्तरावर चर्चा करणाºया चीनने आता आपला रंग दाखवला आहे. एकीकडे शांततेच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे सैन्याची जमवाजमव आणि सराव सुरू असल्याचा व्हीडीओ चीननेच जारी केला आहे. विशेष म्हणजे चीनचे सरकारी प्रसारमाध्यम म्हणून ओळख असणाºया ग्लोबल टाइम्सने हा धक्कादायक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.

व्हीडीओमध्ये सराव करताना चिनी सैन्य
ग्लोबल टाइम्सने ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते की पिपल्स लिबरेशन आर्मीचे (पीएलए) हजारो जवान आणि पीएलएची हवाई ब्रिगेड लष्करी सराव करत आहे. चीन-भारत यांच्यात ज्या सीमेवरून तणाव आहे तिथे पोहोचण्यास या सैनिकांना हुबेई प्रांतातून केवळ काही तास लागतील, असा इशाराही त्या ट्विटमध्ये देण्यात आला आहे.

Read More  पियानोच्या धून ऐकण्यासाठी जंगलातून आला हत्ती

शनिवारी भारत आणि चीनदरम्यान कमांडर स्तरावर चर्चा करण्यात आली होती. एप्रिलमध्ये या सीमाभागात जी स्थिती होती, तीच कायम ठेवावी, अशी भारताने या चर्चेदरम्यान मागणी केली होती. चीनने मात्र, भारताकडे कोणत्याही रस्त्यांची निर्मिती न करण्याची मागणी कायम ठेवली होती.

चिनची दुटप्पी भूमिका उघड

त्यानंतर द्विपक्षीय संबंधांना अधिक दृढ करण्यासाठी भारत चीन सीमा क्षेत्रात शांततापूर्ण वातावरण आवश्यक आहे. दोन्ही पक्षांतर्फे डिप्लोमॅटिक संबंधांच्या ७० व्या वर्षाचीदेखील आठवण काढण्यात आली. लवकरच या प्रश्नाचा तोडगा काढून चांगले संबंध वाढवण्यावर भर देण्यात यावा यावर दोन्ही देशांचे एकमत झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली होती. मात्र आता चीनने पुन्हा आपला रंग दाखवण्यास सुरूवात केली आहे. एकीकडे चर्चा करायची आणि दुसरीकडे आपली युद्धाची तयारी सुरू असल्याचे दाखवायचे, असा खेळ चीनने सुरू केला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या