32.9 C
Latur
Thursday, March 4, 2021
Home राष्ट्रीय जनमतांचा कौल आम्हालाच होता

जनमतांचा कौल आम्हालाच होता

एकमत ऑनलाईन

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीलाच लोकांनी कौल दिला होता. मात्र निवडणूक एनडीएच्या बाजूने होता त्यामुळे ते निवडणूक जिंकले असा आरोप आता राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. भाजपाने असे करण्याची ही पहिली वेळ नाही. २०१५ मध्ये महाआघाडी स्थापन झाली त्यावेळीही जनमताचा कौल आमच्याच बाजूने होता मात्र भाजपाने मागच्या दाराने प्रवेश करुन सत्ता मिळवली, असेही तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.

मी बिहारच्या जनतेचे आभार मानतो असेही तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे़ बिहार निवडणुकीचे निकाल परवा जाहीर झाले. या निवडणूक निकालात एनडीएला बहुमत मिळाले. एनडीएलाला १२५ तर महाआघाडीला ११० जागा मिळाल्या. मात्र मतमोजणीच्या दरम्यान एनडीए आणि महाआघाडीत चांगलीच चुरस पाहण्यास मिळाली. तेजस्वी यादव यांचा राजद हा ७५ जागा मिळवत बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

निवडणूक निकालाच्या दिवशीही तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार हे मतमोजणी प्रक्रियेत ढवळाढवळ करत आहेत, असा आरोप केला होता. महाआघाडीच्या विजयी उमेदवारांना पराभूत घोषित करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला. आता आज पुन्हा एकदा पत्रकार परिषदेत त्यांनी जनमताचा कौल हा आमच्या बाजूनेच होता, मात्र निवडणूक आयोग एनडीएच्या बाजूने होता असा आरोप केला आहे.

उल्फाचा कंमाडर भारतीय लष्कराच्या ताब्यात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या