22.9 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeराष्ट्रीयबिहारमध्ये एनडीए ला बहुमत, पण राजद सर्वात मोठा पक्ष

बिहारमध्ये एनडीए ला बहुमत, पण राजद सर्वात मोठा पक्ष

एकमत ऑनलाईन

पाटणा: निवडणूक आयोगाने बिहार विधानसभेच्या सर्व २४३ जागांचे निकाल जाहीर केले असून अंतिम निकालानुसार बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएचं सरकार बनणार आहे. एनडीच्या ला एकूण १२५ जागा मिळाल्या आहेत. अंतिम निकालानुसार भाजपला ७४ जागा मिळाल्या असून जेडीयूला ४३, व्हीआयपीला ४ आणि हमला चार जागा मिळाल्या आहेत. तर महागठबंधनमध्ये राजदला ७६, काँग्रेसला १९ आणि डाव्या पक्षांना १६ जागा मिळाल्या आहेत.

बिहारमध्ये मंगळवारचा संपूर्ण दिवस हा एनडीए आणि महाआघाडी यांच्यातल्या चुरस पाहण्याचा होता. कारण सुरुवातीला जसे कल हाती येऊ लागले तेव्हा महाआघाडी जिंकते आहे असं दिसू लागलं होतं. मात्र त्यानंतर हे चित्र बदललं. झुकतं माप एनडीएकडे जाऊ लागलं. दरम्यान एनडीए बहुमताकडे जाईल असं वाटत असतानाच पुन्हा एकदा महाआघाडीही त्यांच्या बरोबर स्पर्धा करताना दिसली. रात्रीपर्यंत एनडीए आणि महाआघाडी यांच्यात फारसा फरक नव्हता. त्यामुळे बिहार विधानसभा त्रिशंकू होईल असेही अंदाज काही राजकीय विश्लेषकांनी वर्तवले. मात्र तसं काहीही न घडता एनडीएला १२५ जागा मिळाल्या आहेत आणि बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशकुमारच मुख्यमंत्री होतील हे आता स्पष्ट झालं आहे.

दरम्यान काल रात्री उशिरा मतमोजणीच्या निकालांमध्ये नितीश कुमार ढवळाढवळ करत असल्याचा आरोप महाआघाडीने केला. राजद आणि काँग्रेस नेत्यांचं एक शिष्टमंडळ हे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीला गेलं होतं. आमच्या अनेक उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आलं आणि प्रमाणपत्र घ्यायला जेव्हा ते उमेदवार गेले तेव्हा त्यांना वाट बघायला सांगून नंतर पराभव झाल्याचं सांगण्यात आल्याचा आरोपही महाआघाडीने केला. दरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. तसंच आमच्यावर मतमोजणी करताना कोणताही दबाव नव्हता असंही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

बिहारमध्ये राजद सर्वात मोठा पक्ष, भाजप दुसऱ्या क्रमांकावर
बिहारमध्ये एनडीएला संपूर्ण बहुमत मिळालं असलं तर इथे राजद 75 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर भाजपला 74 जागा मिळाल्या असून तो दुसऱ्या क्रमांकवर आहे. भाजपला मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा 21 जागांचा फायदा झाला आहे. 2015 च्या निवडणुकीत भाजपला 53 जागा मिळाल्या होता. तर नितीश कुमार यांच्या जेडीयूला मोठा फटका बसला आहे. जेडीयूला यंदा 43 जागाच मिळवला आल्या. मागील निवडणुकीत जेडीयूला 71 जागा मिळाल्या होत्या.

बिहार विधानसभेतील पक्षीय बलाबल
एनडीए -125
भाजप – 74
जेडीयू – 43
विकासशील इन्सान पार्टी – 04
हिंदुस्तानी अवाम मोर्चा – 04

महागठबंधन – 110
राजद – 75
काँग्रेस – 19
भाकपा-माले – 12
सीपीएम – 02
सीपीआय – 02

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या