नवी दिल्ली : देशांतर्गत समभागांच्या कमजोरीमुळे आज भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत नवीन विक्रमी नीचांकी पातळीवर आला. जागतिक क्रूडच्या किमतीत वाढ झाल्याचा परिणाम देशांतर्गत चलनावरही झाला.
मंगळवारी रुपयाने ४१ पैशांनी घसरण करत यूएस डॉलरच्या तुलनेत ७८.७८ च्या इंट्रा-डे विक्रमी नीचांकी पातळी गाठली. आंतरबँक परकीय चलनात, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ७८.५३ वर उघडला. त्यानंतर आणखी घसरला. कालही रुपयाची घसरण झाली होती.