गुवाहाटी : मदरसे बंद करणे आणि समान नागरी कायदा हे मुस्लिमांच्या हिताचे आहे. देशाला राज्यांचा संघ म्हणून विरोधक देश तोडण्याची भाषा करत आहेत. अप्रत्यक्षपणे ते इथल्या फुटीरतावादी शक्तींना प्रोत्साहन देत असल्याची टीकाही त्यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पांचजन्य आणि ऑर्गनायझर या नियतकालिकांना ७५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने दिल्लीमध्ये एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात हेमंता बिस्वा सर्मा बोलत होते. ते म्हणाले, जर भारत हा राज्यांचा संघ असेल तर ५००० वर्षांच्या समृद्ध इतिहासाचे उत्तर काय? असा सवालही त्यांनी केला.
सर्मा यांनी आपल्या राज्यातले सरकारी अनुदानित मदरसे बंद केले, त्याबद्दल ते म्हणाले की,जर त्यांना शिक्षणात प्रगती करायची असेल तर मुस्लिमांनी
मदरशांपासून दूर व्हायला हवे. तुम्हाला जर धर्म शिकवायचा असेल तर ते तुमच्या घरी शिकवा. शाळेत तुम्ही फक्त विज्ञान आणि गणितच शिकायला हवे. मदरसे बंद करणे आणि समान नागरी कायदा लागू करणे हे मुस्लिमांच्या फायद्याचे आहे. आम्हाला हे हिंदुत्वासाठी करण्याची गरज नाही. जे अशी मागणी करतात, त्यांना भारतीय मुस्लिमांनी आपला मित्र मानायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.