टणकपूर : मध्य प्रदेशातील बस दुर्घटना ताजी असतानाच उत्तराखंडमध्ये आज मुसळधार पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरात एक स्कूल बस वाहून गेल्याची घटना घडली आहे. सुदैवाने चालक व वाहक वगळता या बसमध्ये कुणीही नव्हते.
त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. यासंबंधीचा एक व्हीडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. किरोरा ओढ्यात मंगळवारी सकाळी ही घटना घडली.