24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयशालेय शिक्षण मंत्र्यानेच सांगितले दारूचे फायदे

शालेय शिक्षण मंत्र्यानेच सांगितले दारूचे फायदे

एकमत ऑनलाईन

रायपूर : आपल्यापैकी अनेक जणांनी दारूच्या फायदे सांगणाऱ्याऐवजी त्याचे तोटे सांगण्याऱ्यांबद्दल ऐकले किंवा पाहिले असेल. शाळा महाविद्यालयातही दारूचे सेवने हानिकारक असल्याचे धडे दिले जातात. मात्र, आता शालेय शिक्षण मंत्र्यानेच दारूचे फायदे सांगितल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, सध्या या शिक्षण मंत्र्याचा दारूचे फायदे नेमके काय सांगणारा वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्तीसगडचे शालेय शिक्षण मंत्री प्रेमसाई सिंह टेकम यांचा हा व्हिडिओ असून यामध्ये ते दारू आणि रस्ते अपघातांवर बोलत असल्याचे दिसून येत आहे. यात संबंधित मंत्री लोक दारू आणि त्याच्याशी संबंधित तोटे याबद्दल बोलतात, परंतु त्याच्याशी संबंधित फायद्यांबद्दल कोणीही बोलत नाही. जेव्हा आपण वाइनबद्दल बोलतो तेव्हा एखाद्याने ते पिण्याची योग्य पद्धतदेखील लक्षात ठेवली पाहिजे असा सल्ला शिक्षण मंत्र्याने दिली आहे. एवढेच काय तर, पाण्यात योग्य प्रमाणात अल्कोहोल मिसळले जाते असे ज्ञानही टेकम देत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दारूच्या फायद्यांशिवाय संबंधित मंत्र्याचा आणखी एक व्हिडिओ व्हारल होत असून, यात ते जिथे रस्ता खराब आहे तिथे अपघात होत नाहीत. जिथे रस्ता चांगला आहे तिथे अपघात होतात असे म्हणत आहे. रस्त्याच्या वाईट स्थितीबद्दल आम्हाला लोकांकडून फोन येतात, परंतु त्या रस्त्यांवर कोणतेही अपघात होत नाही असे टेकम यात म्हणत आहेत. तर, खूप चांगले रस्ते असलेल्या ठिकाणी, वाहनचालक वेगाने वाहन चालवतात आणि अपघातांना बळी पडतात असे टेकम यांचं मत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या