26.4 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeराष्ट्रीयभारत बायोटेकच्या 'कोवॅक्सीन' ची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु

भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सीन’ ची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन या कोरोना वरील लसीची दुसऱ्या टप्याची चाचणी सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्याच्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यात होणारा आणखी एक महत्वाचा बदल म्हणजे लसीच्या दोन डोसेज मधला अंतर वाढवला गेला आहे. पहिल्या टप्प्यात दोन डोसेज मध्ये 14 दिवसांचे अंतर ठेवण्यात आले होते. मात्र, दुसऱ्या टप्प्यात दोन डोसेजमध्ये 28 दिवसांचे अंतर ठेवले जाणार आहे.

दरम्यान, पहिल्या टप्प्यात देशभर ज्या 375 स्वयंसेवकांना ही लस लावण्यात आली होती. त्या सर्वांची प्रकृती चांगली असून त्यापैकी एकाही ही स्वयंसेवकाला कुठलाही त्रास झालेला नाही. त्यामुळे कोवॅक्सीन लसीच्या सुरक्षिततेबद्दल आता कोणतीही साशंकता राहिली नसल्याचे तज्ज्ञांना वाटतंय. पहिल्या टप्प्यातील स्वयंसेवकांना लसीचे दोन डोज लावल्यानंतर त्यांच्या शरीरात कोरोना विषाणू संदर्भात अँटीबॉडीज तयार झाले की नाही याची तपासणीही भारत बायोटेकने केली आहे. मात्र, त्याचा डेटा ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच डीसीजीआय आणि सरकार सोबत शेअर केला जात असून त्यांच्या माध्यमातूनच लवकरच संपूर्ण देशाचा डेटा जाहीर केला जाईल अशी अपेक्षा आहे.

अनिल परब यांच्याकडून नौदल अधिकाऱ्याच्या मारहाणीचे समर्थन

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या